पुणे

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटना मागणी

CD

गत हंगामात तुटलेल्या उसाला
प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या
-----
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : मागील गाळप हंगामात तुटलेल्या उसाच्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभर उच्चांकी दर मिळाला आहेत. यंदा साखर विक्रीमध्ये बाजारात तेजी असून वर्षभर साखरेला चांगला भाव मिळाला आहे. यामुळे गत हंगामात तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या, अशी मागणी दत्त शिरोळ, जवाहर, गुरूदत्त, पंचगंगा या कारखान्यांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
चालू वर्षी ऊस उत्पादक शेतकरी वाढलेले खते, कीटकनाशकांचे दर, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांच्याकडून ऊसतोडणीसाठी झालेली पिळवणूक, वाढलेली मजुरी यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर चांगल्या पद्धतीने वाढत असून पुढील दोन महिने साखर तेजीत विकली जाणार आहे. यामुळे साखर कारखान्यांकडून गेल्या वर्षी तुटलेल्या उसास प्रति टन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली. जर कारखान्यांनी प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यातून बाहेर पडणारे साखर व उपपदार्थ रोखण्यात येणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
या वेळी राजाराम देसाई, सचिन शिंदे, राम शिंदे, तानाजी वठारे, विशाल चौगुले, बंडू पाटील, पुरंदर पाटील, कलगोंडा पाटील, मिलिंद कोले, धुळगोंडा पाटील, श्रीकांत पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT