पुणे

सांगली : शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस बेणे मळा तयार करावा

CD

शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस बेणे मळा तयार करावा

शरद लाड ः ‘क्रांती’मार्फत संशोधन केंद्राकडील मूलभूत ऊस बेणे पुरवठा

ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः ऊस उत्पादन वाढीसाठी सुधारित जातींचा वापर, शुद्ध बेणे आणि योग्य बेणे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी हंगामात ऊस बेणे टंचाईची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच नियोजन करून स्वतःच्या गरजेपुरता बेणे मळा तयार करावा, असे आवाहन क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले.

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या त्रिस्तरीय बेणे मळा योजनेसाठी संशोधन केंद्राकडील मूलभूत ऊस बेणे पुरवठा करण्यात आला. यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथून को-८६०३२ व फुले-१३००७ या जातींचे मूलभूत बेणे, तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथून व्हीएसआय-२११२१ या पूर्वप्रसारित नवीन ऊस जातीची रोपे आणून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली.

शरद लाड म्हणाले, की कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून दरवर्षी सुमारे १० हजार एकर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी येतो. यापैकी जवळपास एक तृतीयांश म्हणजेच ३५०० एकर क्षेत्रावरील ऊस लागणीसाठी दरवर्षी बेणे बदल करण्याचा कारखान्याचा प्रयत्न असतो. यासाठी पायाभूत व प्रमाणित बेणे मळे तयार करणे आवश्यक असून, त्याकरिता संशोधन केंद्रांकडून मूलभूत बेणे खरेदी करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. कारखान्याच्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० टक्के क्षेत्रावर शुद्ध बेणे पोहोचविण्यात कारखान्याला यश आले आहे. शेतकऱ्यांना बेणे सहज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक गट कार्यालयापर्यंत बेणे पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादीला खिंडार, शिंदेंच्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Water Crisis: तीन वस्त्यांवर २५ दिवसांपासून पाणीटंचाई ;पाणीपुरवठा बंद : शिरापूर ग्रामपंचायतीचा हंडा मोर्चासह टँकर रोखण्याचा इशारा

Who is Ira Aditya Raut? बुलढाण्याच्या लेकीने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला... वय फक्त १० वर्ष, १७ तास अन् ३५ मिनिटे; नेमकं काय केलं?

Parli Agriculture Office: परळीच्या कृषी अधिकाऱ्याची राज्यात बाजी; कीड-रोगांची २ हजार ४७४ छायाचित्रे अपलोड करत पटकावला दुसरा क्रमांक

सचिन पिळगांवकर यांच्या आयुष्यात सुप्रियाआधी होती दुसरी मुलगी, जीवापड प्रेम असूनही 'या' कारणामुळे अधुरी राहिली कहाणी

SCROLL FOR NEXT