Sugarcane tractor overturns crushing sister to death sakal
पुणे

ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीखाली दबून सख्ख्या बहिणीचा मृत्यू

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथे काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॉली सह ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात पलटी झाल्याने ट्रॉलीखाली दबून जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे (वय 50 वर्ष ) व भिमाबाई यादव गांडाळ,( वय 52 वर्ष ) सध्या रा.पारगाव ता.आंबेगाव (मूळ रा. अहमदनगर जिल्हा) या ऊस तोडणी करणाऱ्या सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी निरगुडसर येथील महादू संभू वळसे यांच्या शेतातील ऊस तोडणी करून ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.16 सी.व्ही.3514 याला जोडलेल्या दोन टायर गाडीमध्ये ऊस भरून त्या त्यापैकी एका टायर गाडीतील ऊसावर जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे( रा. घारगाव ता. संगमनेर) व भिमाबाई यादव गांडाळ ( रा.पळशी, वनकुटे ता. पारनेर ) या दोघीजणी बसल्या होत्या ट्रॅक्टर अवसरी बुद्रुक पारगाव रस्त्यावरून मेंगडेवाडीच्या दिशेने चालला होता. मुक्ताबाईच्या खिंडीच्या पुढे उतारावर ट्रॅक्टर व एक ट्रॉली रस्त्याच्या कडेला पलटी झाली ट्रॉली वर बसलेल्या दोघी बहिणींच्या अंगावर ऊस पडून उसाखाली व टायरगाडी खाली त्या दोघी दबल्याने त्यांना गंभीर जखमा झाल्या परिसरातील नागरिकांनी तातडीने जेसीबी मशीन आणून त्यांना गाडी व ऊसाखालून काढून संदीप घुले यांच्या रुग्णवाहिकेतून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत असल्याचे घोषित केले मंचर पोलिसांनी ट्रॅक्‍टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT