SID26B02662
सिद्धटेक : ऊस वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक करत असल्यामुळे भरलेल्या ट्रेलरमधून अशा प्रकारे रस्त्यात ऊस पडत आहे.
अवैध ऊस वाहतूक शेतकऱ्यांच्या मुळावर
वाहनचालकांकडून नियमावलीला हरताळ; वाहतुकीवेळी उसाचे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
सिद्धटेक, ता. २५ : काढणीपश्चात योग्य नियोजन न केल्यामुळे लागवडीपासून तुटेपर्यंत जोपासलेल्या उसाचे व परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामध्ये ऊस वाहतूकदारांची मनमानी व बेजबाबदारपणा समोर येत असून, जास्त ऊस वाहतूक करण्यासाठी करकचून भरलेला ट्रेलर भररस्त्यातच अर्धा होत आहे. त्यातही कळस म्हणजे भरलेल्या ट्रेलरमधून रस्त्यात पडलेला ऊस तसाच सोडून चालक ट्रॅक्टर कारखान्याकडे दामटत आहेत.
नुकत्याच सुरू झालेल्या गळीत हंगामाने सध्या गती घेतली आहे. मोठमोठ्या कारखान्यांना उसाचा तुटवडा भासत असतानाच केवळ वाहतूकदारांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कारण ऊसतोड मजुरांनी तोडलेला ऊस व्यवस्थितपणे ट्रेलरमध्ये न भरल्याने व पुढे वाहनचालकांनी त्याची योग्य वाहतूक न केल्यामुळे ऊस रस्त्यावर पडत आहे. दरम्यान, चुकीच्या पद्धतीने ऊस वाहतूक करणे हा रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि जीवघेणा विषय आहे. दरवर्षी ऊस गाळप हंगाम सुरू झाला की नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या ऊस वाहतुकीमुळे अपघातांत देखील वाढ होत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोट
साखर आयुक्तालय आणि प्रादेशिक परिवहन विभागाने अशा बेकायदेशीर व धोकादायक ऊस वाहतुकीला आळा घालण्यासाठी कडक नियम आणि दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे असे वाहन आम्ही कारखाना स्थळावर खाली करून घेत नाही. शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये, म्हणून अशा प्रकारच्या जबाबदारीसाठी स्वतंत्र टीम नेमली आहे.
- विठ्ठल भोसले, जनरल मॅनेजर, अंबालिका शुगर
--------------
इन्फो
अशी होते धोकादायक ऊस वाहतूक
एका ट्रॅक्टरला दोन किंवा अधिक ट्रेलर जोडणे,
ट्रेलरला रिफ्लेक्टर आणि इंडिकेटर नसणे
अल्पवयीन व परवाना नसलेले चालक,
मोठ्या आवाजात गाणी वाजवणे,
रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने वाहन लावणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.