पुणे

ऊस वाहतुकीपूर्वी ट्रॅक्टर-ट्रॉलींची फिटनेस तपासणी

CD

ऊस वाहतुकीचे छायाचित्र

ऊस वाहतुकीपूर्वी ट्रॅक्टर-ट्रॉलींची फिटनेस तपासणी
सोलापूर जिल्ह्यात लवकरच विशेष मोहीम; रिफ्लेक्टर, कागदपत्रांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : ऊस गाळप हंगामाला सुरुवात होण्यास महिनाभराचा कालावधी असताना जिल्ह्यात ऊस वाहतुकीची तयारी सुरू झाली आहे. साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरधारकांशी करार केले असून, या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून ट्रॅक्टर-ट्रॉलींची फिटनेस तपासणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर बैठक झाल्यानंतर नियमित तपासणीबरोबरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, अंगद-जुगाड गाड्या व ट्रकच्या सुरक्षेबाबत साखर आयुक्तालयाने साखर कारखाने व प्रादेशिक परिवहन विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नोंदणीकृत ट्रॅक्टर-ट्रॉलीच ऊस वाहतुकीसाठी वापरली जात आहे का, तसेच चालकाकडे विमा, वाहन चालविण्याचा परवाना आदी आवश्यक कागदपत्रे आहेत का, याची खातरजमा केली जाणार आहे.
वाहतुकीस योग्य स्थितीत नसलेल्या ट्रॉलीमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे ट्रॉलीची फिटनेस तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टिव्ह टेप बसविण्यात येणार आहेत. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी तसेच हंगामातही वाहन कायद्याचे पालन होत आहे की नाही, यावर आरटीओचे लक्ष राहणार आहे.

महामार्गावर सेवारस्त्याचा वापर करा
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी महामार्गावर जाताना जेथे सेवारस्ता (सर्व्हिस रोड) उपलब्ध आहे, तेथे त्याचा वापर करावा. सेवारस्ता नसलेल्या ठिकाणीच महामार्गाचा वापर करावा, अशा सूचना साखर आयुक्तालयाने कारखान्यांना दिल्या आहेत.

चौकट
तपासणीत काय पाहणार?
ट्रॅक्टर-ट्रॉलीची वाहतूकयोग्यता
रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टिव्ह टेप
चालकाचा परवाना व वाहनाचा विमा
आवश्यक वाहन कागदपत्रे
वाहन कायद्याचे पालन

कोट
ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या फिटनेस तपासणीला लवकरच सुरुवात होईल. जिल्हास्तरावर बैठक झाल्यानंतर ट्रॅक्टर-ट्रॉलींची तपासणी केली जाईल. तसेच वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टिव्ह टेप बसविण्यात येतील.
- विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT