पुणे

ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला कंटेनरची जोराची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

CD

कंटेनरची ट्रॉलीला धडक; दोन ऊसतोड मजूर ठार
महूद-अकलूज मार्गावरील घटना; तिघांनी प्रसंगावधान राखल्याने बचावले
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ५ : महूद (ता. सांगोला) गावच्या शिवारात महूद- अकलूज मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर कंटेनरचालक जखमी झाला. धडकेमुळे उसाची ट्रॉली उलटली, तर कंटेनर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतात घुसला.
सुदाम पंडित राठोड (वय ३१, रा. श्रीराम तांडा, पांगरी गोसावी, ता. मंठा, जि. जालना) आणि भीमा प्रकाश मुंढे (वय २०, रा. वडरवाडी, ता. परतूर, जि. जालना) अशी मृत मजुरांची नावे आहेत. कंटेनरचालक सुशांत सुभाष घाडगे (वय ३६, रा. मलठण, फलटण, जि. सातारा) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी कृष्णा संपत चव्हाण (वय ४५, सध्या रा. बंडगरवाडी क्र. २, चिकमहूद, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा चव्हाण हे गेल्या महिन्यापासून प्रताप दत्तात्रय पाटील यांच्याकडे ऊसतोडणीचे काम करीत होते. बुधवारी (ता. ४) रात्री नऊच्या सुमारास महूद शिवारातील ईश्वर भीमराव कोळेकर यांच्या शेतातील ऊसतोडणीचे काम पूर्ण करून दोन ट्रॉलींत ऊस भरला होता. मात्र, एकावेळी दोन्ही ट्रॉली शेतातून बाहेर काढणे शक्य नसल्याने एक ट्रॉली ट्रॅक्टरला जोडून महूद- अकलूज रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी केली होती. ट्रॅक्टरचालक दुसरी ट्रॉली आणण्यासाठी शेतात गेला होता. त्यावेळी कृष्णा चव्हाण यांच्यासह सुदाम राठोड, भीमा मुंढे, संतोष मोगल आणि अर्जुन मुंढे हे ट्रॉलीच्या मागे थांबले होते.
दरम्यान, अकलूजच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने उभ्या ट्रॉलीला जोराची धडक दिली. धडकेने ट्रॉली उलटली आणि मागे थांबलेल्या सुदाम राठोड व भीमा मुंढे यांना कंटेनरची धडक बसली. सुदाम राठोड यांना फरफटत नेत कंटेनर रस्त्याच्या पलीकडील शेतात घुसला. कंटेनर अंगावर येत असल्याचे लक्षात येताच कृष्णा चव्हाण, संतोष मोगल आणि अर्जुन मुंढे यांनी बाजूला धाव घेतल्याने ते बचावले.
अपघातानंतर घटनास्थळी धाव घेतली असता सुदाम राठोड आणि भीमा मुंढे हे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. मात्र, दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला होता. जखमी कंटेनरचालकासह दोन्ही मृतांना खासगी वाहनातून सांगोला येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. भरधाव व निष्काळजीपणे कंटेनर चालवून दोन मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक सुशांत घाडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

SCROLL FOR NEXT