पुणे

Coronavirus : महापालिकेकडून डॉक्टरांना दवाखाने उघडे ठेवण्याची सूचना मात्र, सक्ती अन्यायकारक

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील डॉक्‍टरांना दवाखाने उघडे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संकट प्रसंगी प्रशासनास आम्ही सर्व प्रकारची मदत करण्यास कटिबद्ध आहोत. परंतु, दवाखाने उघडे ठेवण्याची सक्ती अन्यायकारक आहे, अशी भूमिका डॉक्‍टर वर्गाने घेतली आहे. 

शहर परिसरात सुमारे 450 लहान-मोठी खासगी रुग्णालये आणि 1 हजारांपेक्षा जास्त दवाखाने आहेत. कोरोनाचा संसर्ग होईल या धास्ती घेत काही डॉक्‍टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले होते. त्यामुळे, महापालिकेने डॉक्टरांच्या संघटनांना त्यांचे दवाखाने उघडे ठेवण्यासंदर्भात पत्रे पाठविली आहेत. परंतु, सद्यस्थितीत दवाखान्यांमध्ये गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग डॉक्टर, त्यांचे मदतनीस आणि इतर रुग्णांना होण्यापासून कसा थांबविता येईल, असा प्रश्न उपस्थित करुन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दवाखाने उघडे ठेवण्याची सक्ती अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. 

"आयएमए'चे प्रमुख मार्गदर्शक डॉ.दिलीप कामत, अध्यक्ष डॉ.सुहास माटे आणि सचिव डॉ.सुधीर भालेराव यांनी त्याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये, त्यांनी म्हटले आहे की,""रस्त्यावर कर्मचाऱ्यांची पोलीसांकडून होणारी अडवणूक, अनेक दवाखान्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षा साधनांचा अभाव व काही डॉक्टरांचे वय  65 वर्षांपुढील असल्याने केवळ 20 टक्के दवाखाने बंद आहेत. तर उर्वरीत 80 टक्के दवाखाने चालू आहेत. सर्व डॉक्टर्स दूरध्वनीवर उपलब्ध आहेत. जरुरीनुसार ते रुग्णांना दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष वेळ देऊन दवाखान्यात सेवा देऊ शकतात. परंतु, दवाखाने उघडे ठेवण्याची सक्ती झाल्यास दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढेल. तसेच त्याने, डॉक्‍टर किंवा त्यांच्या मदतनीसांकडून इतर रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही निर्माण होईल.'' 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले,""विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार आम्ही शहरातील आयएमए, "निमा' आदी डॉक्‍टरांच्या संघटनांना दवाखाने उघडे ठेवण्याबाबत पत्रे पाठविली आहेत. या संघटनांनी त्याबाबत आपापल्या सदस्यांना कळविणे अपेक्षित आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT