Suicide attempt of young man due to one sided love crime pune police  esakal
पुणे

Crime News : एकतर्फी प्रेमातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्वत:वर चाकूने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कर्वेनगर परिसरात घडली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्वत:वर चाकूने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कर्वेनगर परिसरात घडली. प्रसाद चंद्रकांत दांगट (वय ३४, रा. वडगाव बुद्रूक) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून वारजे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तरुणीला धमकी आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद दांगट हा एका कर्वेनगर येथील ३२ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. परंतु तरुणीने त्याला प्रेमास नकार दिला होता. तरीही तो या तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. गेल्या २४ मार्चपासून हा प्रकार सुरू होता.

त्याने आठ एप्रिल रोजी कर्वेनगर ते औंधदरम्यान तरुणीला गाठले. ‘तू दुसऱ्यासोबत लग्न कशी करते, ते बघतोच’ अशी धमकी त्याने तरुणीला दिली. त्यानंतर तरुणाने चाकूने स्वत:च्या पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेडमध्ये संभाजी बिग्रेड आक्रमक

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT