पैशाच्या टेन्शनमध्ये तरुणाने पोलिस पत्नीला
पाठवला आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ
मेसेज पाहताच महिला पोलिस बेशुद्ध; समुपदेशनानंतर तरुणाने बदलला इरादा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : ‘मला खूप टेन्शन आले आहे, बचतगटाचे पैसे काकाने भरले नाहीत. मला खूप मानसिक त्रास होत आहे. मी रेल्वे पटरीवर आत्महत्या करण्यासाठी आलो आहे’ असा व्हिडिओ ३६ वर्षीय तरुणाने पोलिस पत्नीला पाठवला. घरातून ड्युटीसाठी आलेली पत्नी व्हिडिओ पाहून जागीच बेशुद्ध पडली. पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिस धर्मवीर संभाजी तलावाजवळ (कंबर तलाव) पोहचले. त्यांनी तरूणाला शोधले आणि त्याचे समुपदेशन केले. त्यावेळी त्याने आत्महत्येचा विचार बदलला.
गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास महिला पोलिस कर्मचारी साखर पेठेतील घरातून जेलरोड पोलिस ठाण्याला ड्युटीसाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पती अब्दुल रहमान मुबीर शेरी याने कंबर तलावाजवळील रेल्वे पटरीवर आत्महत्येसाठी आल्याचा व्हिडिओ पत्नीच्या व्हॉट्सॲपवर टाकला. त्यावेळी महिला पोलिस कर्मचारी जागेवरच बेशुद्ध पडली. त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणले आणि हकीकत विचारली. त्यावेळी त्यांनी पतीचा व्हिडिओ अधिकारी व अनय् अंमलदारांना दाखवला. त्यानंतर जेलरोड, अशोक चौकी व विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आयटीआय पोलिस चौकीचे बीट मार्शल तलावाजवळ पोचले. त्यांनी अब्दुलच्या मोबाईलवर संपर्क साधून त्याला विश्वासात घेऊन कोठे आहे, अशी विचारणा केली. त्याठिकाणी जाऊन त्याचे समुपदेशन केले. पत्नी, मुलांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्याचे मन बदलले आणि त्याने आत्महत्येचा विचार डोक्यातून काढला. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्टे यांनी आत्महत्येचे कारण विचारून त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि बचतगटाचे पैसे तात्काळ द्यायला लावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.