Yerwada Central Jail  sakal
पुणे

येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नीचा खुन केल्यानंतर येरवडा मध्यमवर्ती कारागृहात असलेल्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

पत्नीचा खुन केल्यानंतर येरवडा मध्यमवर्ती कारागृहात असलेल्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुणे - पत्नीचा खुन केल्यानंतर येरवडा मध्यमवर्ती कारागृहात असलेल्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहाच्या परिसरात घडली. एका कैद्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सचिन मधुकर नरवाडे (वय 31 , रा. शिक्रापूर, मूळ रा. सावंगी, भोकरदन,जालना) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. सचिन नरवाडे हा त्याची पत्नी कांचन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी सातत्याने भांडत असे. 2 जून 2022 या दिवशी शिक्रापूर परिसरातील बजरंगवाडी येथे त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला होता. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सचिनला अटक केली होती. त्यानंतर न्यायालायाच्या आदेशाने सचिनला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

दरम्यान, गुरुवारी (ता.7) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास न्यायालयीन कोठडीतील कैद्यांना मोकळे सोडण्यात आले होते. त्यानंतर अर्ध्या तासाने कैद्यांची मोजणी करण्यात आली. तेव्हा, सचिन नरवाडे हा तेथे आढळून आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कारागृहातील रुग्णालय विभागाच्या जवळील बराक क्रमांक दोनजवळच्या वडाच्या झाडाला सचिनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT