police sakal media
पुणे

हवेली : अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

लोणी काळभोर : 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारेवस्ती येथे बुधवारी (ता. 9) दुपारी एकच्या सुमारास घडला. निकिता लोकेश राठोड (रा. पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश राठोड हे गवंडी म्हणून काम करतात. ते नेहमीप्रमाणे बुधवारी (ता. 9) दुपारी एकच्या सुमारास जेवायला घरी असता त्यांना निकिता आढळून आली नाही. त्यांनी शेजारील खोलीत जाऊन पहिले तेव्हा ओढणीच्या साहय्याने कपडे अडकविण्याच्या आकडीला अंकिता लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला नागरिकांच्या मदतीने खाली घेण्यात आले. तीने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिला उपचारासाठी लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात नेले असता. तिचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. निकिताने का आत्महत्या केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT