suicide sakal
पुणे

Pune News : जमीन व्यवहारातून वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्याची आत्महत्या

जमिनीच्या व्यवहार प्रकरणात धमकी दिल्यामुळे खासगी वित्तीय संस्थेतील एका कर्मचाऱ्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वाडेबोल्हाई केसनंद येथील जमिनीच्या व्यवहार प्रकरणात धमकी दिल्यामुळे खासगी वित्तीय संस्थेतील एका कर्मचाऱ्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसर येथील मांजरी बुद्रूक परिसरात सोमवारी घडली.

विजयकुमार कुटे (वय-४३, रा. कुंजीरवस्ती, मांजरी बुद्रूक) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी मनीषा कुटे (वय-३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सचिन आनंदा इंगळे (वय-३५, रा. खराडी, चंदननगर), आनंदा इंगळे (वय-५०, रा. चंदननगर) आणि तानाजी भोर (वय-५२, रा. केसनंद) या तिघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटे यांनी सचिन इंगळेच्या मध्यस्थीने वाडेबोल्हाई परिसरात दहा गुंठे जमीन खरेदी केली होती. त्यांनी जमीन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर जमिनीचे मूळ मालक तानाजी भोर यांनी आक्षेप घेतला. कुटे यांनी इंगळेला आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यास सांगितला. परंतु इंगळे आणि भोर यांनी कुटे यांना धमकावण्यास सुरवात केली.

त्यांच्या सततच्या धमकीमुळे कुटे यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT