Yogita-Chaudhary
Yogita-Chaudhary 
पुणे

'त्या' डॉक्‍टर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - सासरच्या छळाला कंटाळून डॉक्‍टर महिलेने शुक्रवारी रात्री पेटवून घेतले होते. या घटनेत त्या 100 टक्‍के भाजल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

योगिता चेतन चौधरी (वय , रा. शिवअंब सदन उद्योग नगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा पती चेतन चौधरी, सासू रजनी चौधरी आणि सासरे गोविंद चौधरी यांच्या विरोधात विवाहितेच्या छळ करणे आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता आणि तिचे पती चेतन हे दोघेही डॉक्‍टर आहेत. चिंचवडेनगर परिसरात त्यांचा दवाखाना आहे. फिर्यादी योगिता आणि तिच्या सासरकडील मंडळींमध्ये विविध कारणावरून वाद होत असे. 

शुक्रवारी देखील त्यांच्यामध्ये वाद झाल्याने सासरकडील मंडळींनी योगिता यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यामुळे पोलिसांनी योगिता यांना समज दिली. त्यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास योगिता घरी गेल्या. त्यांनी मुंग्या मारण्याचे औषध पाण्यामध्ये मिसळून प्यायल्या. काही वेळेनंतर सोसायटी जवळच्या किराणा दुकानात जाऊन त्यांनी रुपयांचे रॉकेल बाटलीमध्ये आणले. मुंग्या मारण्याचे औषध प्यायल्याने योगिता यांना पोटात मळमळू लागले. यामुळे त्यांनी पतीला घरी बोलविले. 

पती चेतन यांनी योगिता यांना रागावून पुन्हा हाताने मारहाण केली. यामुळे संतापलेल्या योगिता यांनी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर चेतन यांनी तिच्या हातातील बाटली घेत उरलेले थोडे रॉकेल योगिता व स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. रागाच्या भरात योगिता यांनी पतीच्या हातातील काडेपेटी हिसकावून घेत स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत योगिता या शंभर टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

पती चेतन चौधरी, सासू रजनी चौधरी आणि सासरे गोविंद चौधरी यांची प्रकृती बिघडल्याने ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाईल, असे उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT