lover suicide
lover suicide 
पुणे

तु तुझ्या जीवाला त्रास करुन घेऊ नकोस;प्रियकाराचा शेवटचा निरोप 

सकाळ वृत्तसेवा

हडपसर(पुणे) : प्रेमविवाह करणाऱ्या तरुणास त्याच्या सासऱ्याने दमदाटी केल्याच्या कारणावरुन त्याने शुक्रवारी पहाटे पावणे दोन वाजता हडपसर येथे रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी तरुणाच्या सासऱ्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कृष्णा मंडलिक (वय 24, रा. काळेपडळ, हडपसर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी यमुनाबाई मंडलीक (वय 60) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन धोंडीबा साहबेराव शिंदे (वय 45, रा. काळेपडळ, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 हडपसर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा कृष्णा मंडलीक हा हडपसर येथील एका सराफी दुकानामध्ये काम करीत होते. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणीसमवेत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिच्यासमवेत सात जुलैला लग्न केले.  दुसऱ्या दिवशी त्याने हडपसर पोलिस ठाण्यात जबाबही दिला. लग्नानंतर दोन दिवसांनी त्याने प्रथा-परंपरेप्रमाणे पत्नीला माहेरी पाठविले. त्यानंतर एकदा त्याने पत्नीस फोन केला, त्यावेळी तिने त्यास पुन्हा फोन न करण्याबाबत बजावले. तर तिच्या वडीलांनी त्यास दमदाटी केली. त्यामुळे अस्वस्थ होऊन त्याने शुक्रवारी पहाटे पावणे दोन वाजता रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.

तुझ्या जीवाला त्रास करुन घेऊ नकोस ! 
कृष्णाने आत्महत्येपुर्वी व्हॉटस्‌अपवर पाठविलेला मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लग्न झाल्यानंतर लगेचच पत्नी दुरावल्याची वेदना त्याने मेसेजद्वारे व्यक्त केली. "झाले ना आता तुझ्या मर्जीसारखे. स्वप्न तू रंगवले आणि त्याचा त्रास मला झाला. तु सगळे तुझ्या मर्जीसारखे केलेस, जवळपण तूच घेतलेस आणि लांबही तुच केले.'' असे सांगतानाच त्याने "काल मला तुझ्या घरच्यांनी खूप धमकावले, खूप त्रास दिला' अशा शब्दात तिच्या वडीलांनी धमकावल्याचाही उल्लेख केला. "माझं काय चुकले वर्षा, तू म्हणाली तसं मी वागत होतो. सॉरी, मी हे चुकीचं पाऊल उचलतोय. तू तुझ्या जिवाला त्रास करून घेऊ नको' अशा स्वरुपाचा मेसेज त्याने जवळच्यांना पाठविला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT