पुणे

मराठी रॅपमधून भाषेची ताकद !

CD

पुणे, ता. १२ ः कधी शब्दांची लय, कधी कवितेचा भाव, तर कधी बडबडगीतांचा खेळकर अंदाज...त्यासह ‘बेला’, ‘अस्थिरता’ यासारख्या रचना सादर करत मराठी रॅपर सुजय जाधव (सुजय जिब्रिश) यांनी गुरुवारी मराठी रॅपच्या माध्यमातून मानवी भावविश्व, एकटेपणा आणि अस्वस्थता यांचे दर्शन घडविले. ‘क ला काना का’ यासारख्या भाषिक प्रयोगांतून त्यांनी मराठी शब्दांची ताकदही उलगडली. रॅपच्या तालावर रंगलेल्या या अनोख्या मैफलीला रसिकांनीही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘द सात्त्विक रॅप’ या कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी रॅपर, लेखक व कवी सुजय जाधव यांनी गुरुवारी आपल्या सादरीकरणातून रॅपचे वेगळे विश्व उभे केले. जाधव यांनी सहजसोप्या पद्धतीने ‘मराठी रॅप’चे अंतरंग उलगडले. ‘रॅप म्हणजे केवळ मनोरंजन नसून भावना, विचार आणि अनुभव व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे’, असे सांगत त्यांनी मराठी कविता आणि रॅप यांच्यातील नाते स्पष्ट केले. मराठी कवितेतील लय, ताल आणि शब्दसंपत्तीचाही त्यांनी ऊहापोह केला. ‘रॅपसाठी विशिष्ट भाषा किंवा बोलीची गरज नसते. प्रत्येक प्रादेशिक बोलीभाषेत रॅपची स्वतंत्र ताकद दडलेली आहे. पारंपरिक काव्यरचना आणि आधुनिक विचार यांची सांगड घालत मराठी भाषेतही अनेक प्रयोग करता येतात,’ असे सांगत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण मराठी रॅपचे सादरीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT