पुणे

सुकलवाडीने पटकविला ‘आदिशक्ती पुरस्कार’

CD

वाल्हे, ता. ५ : शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आदिशक्ती अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुकलवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवित ‘आदिशक्ती पुरस्कार’ पटकावला आहे. या यशामुळे सुकलवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आदिशक्ती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य व पोषण, शासनाच्या योजनांचा लाभ, महिला बचत गटांचे बळकटीकरण आणि ग्रामस्तरावरील लोकसहभाग या निकषांवर ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करण्यात आले. या अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याने रिसे ग्रामपंचायतीने द्वितीय तर माळशिरस ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचत गट, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची शासनाने दखल घेत हा सन्मान जाहीर केला आहे.
दरम्यान, ‘आदिशक्ती पुरस्काराच्या यशामागे ग्रामपंचायत पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचत गट, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे सामूहिक योगदान असल्याची भावना सुकलवाडीचे युवा सरपंच संदेश पवार यांनी व्यक्त केली. ‘आपला सन्मान... आपल्या गावाचा अभिमान’ ही भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी या यशाचा आनंद साजरा केला असल्याचेही सरपंच पवार यांनी सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांसह सुकलवाडी ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT