Sukameva
Sukameva 
पुणे

जीएसटीमुळे सुकामेव्याचे भाव दुप्पट (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दिवाळीच्या शुभेच्छांसोबत सुदृढ आरोग्यासाठी सुकामेवा (ड्रायफ्रूट) देण्याचा ट्रेंड हिट ठरतोय. बदाम, बेदाणे, काजू, अंजीर, पिस्ता यांच्या मिक्‍सच्या विविध ड्रायफ्रूट बॉक्‍सला सर्वाधिक पसंती मिळत आहे. सिंगल ड्रायफ्रूट बॉक्‍सही विक्रीसाठी ठेवले आहेत. फिश स्टाइल, स्क्वेअर, राउंड शेप, हार्ट शेपमध्ये ते उपलब्ध आहेत. 

दिवाळीत कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचाऱ्यांना फराळाबरोबरच ड्रायफ्रूट, चॉकलेट आदी वस्तू भेट दिल्या जातात. आकार आणि गुणवत्तेनुसार सुक्‍या मेव्याची किंमत ठरते. काजू, पिस्ता, बदाम, अंजीर, बेदाणे, अक्रोड, खारीक यांची आवकही वाढली आहे. घाऊक ते किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत सुकामेव्याची उलाढाल वाढल्याची माहिती व्यापारी श्‍वेता पतंगे यांनी दिली. सुकामेवा बॉक्‍सच्या किमतीही ३५ टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. दिवाळीत बदाम, अक्रोड, काजू, किसमिस, पिस्ता, खारीक यांना मागणी वाढते. २५० ग्रॅम ते दोन किलोपर्यंतच मिक्‍स ड्रायफ्रूट बॉक्‍सला चांगली मागणी आहे. शहरातील बहुतांश व्यावसायिकांनी २०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत रेंजचे बॉक्‍स तयार केले आहेत.

किमती (प्रतिकिलो रुपयांत)
 बदाम    ७०० ते १००० 
 काजू    ७५० ते ११००
 किसमीस    २५० ते ४००
 अंजीर    ६०० ते ७००
 अकबरी पिस्ता    १८०० 

सुकामेव्याच्या अर्धा किलोच्या बॉक्‍ससाठी यापूर्वी ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत होते. मात्र, यंदा जीएसटीमुळे ७०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गिफ्ट बॉक्‍सचा व्यवसाय ४० टक्‍क्‍यांनी घटला आहे. सध्या मार्केट परिसरात खऱ्या अर्थाने बिझनेस करून देणारी गर्दी होत नाहीये.
- श्‍वेता पतंगे, विक्रेत्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT