सुलेम अन्सारीची गोल ठरला निर्णायक
शालेय फुटबॉल स्पर्धा
पुणे, ता. २१ ः शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित चौदा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या शालेय फुटबॉल स्पर्धेत सुलेम अन्सारीने २६ व्या मिनिटास केलेल्या गोलच्या जोरावर अग्रसेन हायस्कूलने रश्मी इंग्रजी माध्यम स्कूलवर विजय मिळविला.
अन्य लढतीत क्रूट मेमोरियल स्कूल, खडकीच्या सेंट जोसेफ बॉईज स्कूल, कोथरूडच्या सिटी इंन्टरनॅशनल स्कूल आणी भारतीय विद्याभवनचे परांजपे माध्यमिक स्कूलने विजय प्राप्त केले होते.
ढोबरवाडी येथील पीडीएफएच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हम्माद शेखने केलेल्या (१८ व ३४ वे मिनीट) दोन गोलच्या जोरावर क्रूट मेमोरियल स्कूलने वानवडीच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलचा दोन गोलने पराभव केला.
अहद शेखने केलेल्या (८ व २६ वे मिनीट) दोन गोलच्या जोरावर खडकीच्या सेंट जोसेफ बॉईज स्कूलने कळसच्या आर ॲण्ड डी ई स्कूलवर २-० असा विजय मिळविला.
कोथरूडच्या सिटी इंन्टरनॅशनल स्कूलने सेंट थॉमस पब्लिक स्कूलवर ३-० असा विजय मिळविला. त्यात प्रमुख वाटा दोन गोल करणाऱ्या देवांश धुमाळचा (२ व १७ वे मिनीट) होता त्याला अर्णव इंगवलेने (२६ वे मिनीट) एक गोल करून सुरेख साथ दिली.
आनंद खर्चेर्ने खेळाच्या २८ व्या मिनिटास केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय विद्याभवनचे परांजपे माध्यमिक स्कूलने ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलला नमविले होते.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.