Sumitra Mahajan  sakal
पुणे

Sumitra Mahajan : संविधाननिर्मात्यांचा आरक्षणाबाबत अपेक्षाभंग ; सुमित्रा महाजन यांची खंत

‘संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाला पाच ते दहा वर्षांची कालमर्यादा दिली होती. त्यात वंचित समाज घटकांची सर्वांगीण उन्नती झाली नाही तर मर्यादा वाढवावी असे म्हटले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाला पाच ते दहा वर्षांची कालमर्यादा दिली होती. त्यात वंचित समाज घटकांची सर्वांगीण उन्नती झाली नाही तर मर्यादा वाढवावी असे म्हटले होते. आपण मात्र आजपर्यंत आरक्षणाला फक्त मुदतवाढ देत आलो आहोत. डॉ. आंबेडकर यांना अपेक्षित असलेले उत्थानाचे कार्य पूर्ण झालेले नाही,’ अशी खंत माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली.

गरवारे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ‘पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया, प्रांत संघचालक डॉ. नाना जाधव, रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे उपस्थित होते. सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल दक्षिण तमिळनाडूच्या सेवा भारती आणि वाङ्मय क्षेत्रातील कार्याबद्दल केरळच्या भारतीय विचार केंद्रम् या संस्थांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. सेवाभारतीचे अध्यक्ष डॉ. वादीवेलजी मुरगण आणि भारतीय विचार केंद्रमचे अध्यक्ष डॉ. जयमनजी यांनी पुरस्कार स्वीकारला.

सुमित्रा महाजन पुढे म्हणाल्या की, ‘‘जातीपातीच्या राजकारणामुळे समाजमन ढवळून निघत आहे. केवळ पैसा, राजकारण आणि प्रसिद्धीसाठी जातीय राजकारण होते. समाजाच्या उत्थानासाठी दूरगामी कार्य होत नाही. त्यामुळेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सुजाण लेखकांनी पुनर्जागरण करायला हवे.’’

या वेळी केतकी गद्रे यांनी वैयक्तिक गीत, तर सुरभी जोशी यांनी पसायदान सादर केले. मेघना देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप सबनीस यांनी आभार मानले.

संघ वैचारिक जागरण करणार

शंभरीकडे वाटचाल करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वैचारिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागरणाचे कार्य करणार आहे, अशी माहिती संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘समाजातील सज्जन शक्तीला जोडत संघ व्यक्ती निर्माणाचे कार्य करत आला आहे. सेवा क्षेत्रातही संघ निरंतर कार्य करत आहे. आता वैचारिक क्षेत्रातील पुनरुत्थानासाठी संघ काम करेल. संतशक्ती, संघशक्ती आणि समाजशक्ती सोबत आली तर राष्ट्राची प्रगती होईल. संघ सत्तेपेक्षाही समाजपरिवर्तन हे आपले काम समजतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT