Dog Care
Dog Care Sakal
पुणे

उन्हाळ्यात जाणून घ्या ‘मुक्या भावनां’ना

सकाळ वृत्तसेवा

एकीकडे उन्हाचा कडाका वाढला असून घराबाहेर पडणे नागरिकांना तापदायक ठरत आहे. अशात पाळीव प्राण्यांना देखील उन्हाचा त्रास होऊ शकतो.

पुणे - एकीकडे उन्हाचा (Summer) कडाका वाढला असून घराबाहेर पडणे नागरिकांना तापदायक ठरत आहे. अशात पाळीव प्राण्यांना (Animal) देखील उन्हाचा त्रास होऊ शकतो. तुमच्या घरी देखील श्र्वान (Dog) किंवा मांजर (Cat) आहेत का? तर मग इकडे लक्ष द्या. उन्हाळ्यात आपल्या श्र्वानांची किंवा मांजरांची काळजी कशी घ्यावी आणि घरातील या सदस्याला घेऊन बाहेर फिरण्याचा विचार असेल तर हे समजून घ्या.

घरात काय काळजी घ्याल?...

  • श्र्वानांना किंवा मांजरांना सावलीच्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे

  • त्यांना भरपूर पाणी देणे

  • शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत त्यांना बाहेर फिरविणे टाळा

  • त्यांना पिण्यासाठी भरपूर ताजे व स्वच्छ पाणी द्या

  • ते पाणी पीत नसतील तर मग त्यांच्या आवडीचे पदार्थ पाण्यात टाकून पाणी प्यायला द्या

  • त्यांना अंघोळ घालणे, यामुळे त्यांची त्वचा थंड राहते

बाहेर जात असाल तर...

  • जास्त काळ उन्हात राहिल्याने उष्माघाताची शक्यता

  • बाहेर जाताना पाणी घेऊन जाणे

  • जास्त वेळ श्र्वानांना किंवा मांजरांना गाडीमध्ये ठेवू नये

  • पाळीव प्राण्यांना माणसाप्रमाणे घाम येत नाही, पण त्यांच्या शरीराचे तापमान लवकर वाढू शकते

  • शरीराचे तापमान कमी करण्यासाठी ते पाणी पितात

‘सनबर्न’पासून करा बचाव...

  • मांजर किंवा श्र्वानांनादेखील ‘सनबर्न’चा त्रास होतो

  • विशेषतः लहान व कमी केस असलेल्या श्र्वानांना आणि मांजरांना त्रास होऊ शकतो

  • दीर्घकाळ उन्हात राहिल्याने त्यांना ही त्वचेचे आजार होऊ शकतात

  • यासाठी त्यांनादेखील सनस्क्रीन लावावी

  • प्रत्येक तीन ते चार तासांनी त्यांना सनस्क्रीन लावणे

श्‍वानांमधील जलशुष्कतेची लक्षणे

  • उन्हाळ्यात श्र्वानांना जलशुष्कता होण्याची शक्यता

  • अशा वेळी जास्त लाळ गळते

  • कोरड्या हिरड्या

  • भूक न लागणे

  • धडधडणे किंवा दम लागणे

  • डोळे बारीक होणे

  • उलट्या किंवा पोट बिघडणे

  • कमी उत्साही वर्तन किंवा सुस्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT