Asani cyclone sakal
पुणे

'असानी'चक्रीवादळामुळे पुणेकरांचा उन्हाळा सुसह्य

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळामुळे पुणेकरांचा उन्हाळा काहीसा सुसह्य झाला आहे. चाळीशीपार जाणाऱ्या कमाल तापमानामुळे अक्षरशः अंगाची लाहीलाही होत होती.

सकाळ वृत्तसेवा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळामुळे पुणेकरांचा उन्हाळा काहीसा सुसह्य झाला आहे. चाळीशीपार जाणाऱ्या कमाल तापमानामुळे अक्षरशः अंगाची लाहीलाही होत होती.

पुणे - बंगालच्या उपसागरात (Bengal Sea) निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळामुळे (Asani Cyclone) पुणेकरांचा (Pune) उन्हाळा (Summer) काहीसा सुसह्य झाला आहे. चाळीशीपार जाणाऱ्या कमाल तापमानामुळे (Temperature) अक्षरशः अंगाची लाहीलाही होत होती. मात्र सोमवार (ता. ९) पासून कमाल तापमानात लक्षणीय घट होत असून, बुधवारी सरासरी कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

दिवसभर आकाश ढगाळ होते. तर संध्याकाळी पावसाळी वातावरण तयार झाले होते. जणू कोणत्याही क्षणी पाऊस पडेल. मागील चार दिवसात सरासरी कमाल तापमानात चार अंश सेल्सिअसने घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस तरी शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस तरी पुणेकरांना असह्य उन्हाळ्यापासून अंशतः सुटका मिळेल.

विदर्भात उष्णतेची लाट कायम -

कमाल तापमानात वाढ होत असल्याने विदर्भात उष्ण लाट आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. आज (ता. १२) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तसेच राज्यात ढगाळ हवामानासह कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांवर असल्याने विदर्भातील अकोला येथे उष्णतेची लाट आली आहे. विदर्भातील वर्धा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे येथे तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे असल्याने उन्हाचा चटका चांगलाच तापदायक ठरत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ अंशांची वाढ झाल्याने नगर येथेही उष्ण लाटेची स्थिती आहे.

‘असानी’ची तीव्रता ओसरली -

बंगालचा उपसागरातील ‘असानी’ तीव्र चक्रीवादळ किनाऱ्याजवळ येताच त्याची तीव्रता कमी झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून पुन्हा बंगालच्या उपसागराकडे जाण्याचा अंदाज असून, आज (ता. १२) त्याचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. दक्षिण भारतातील राज्य ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी कोसळत असून, महाराष्ट्रातही ढगाळ हवामान झाले आहे.

पुणे शहरातील सरासरी कमाल तापमान (अंशसेल्सिअस)

  • रविवार (ता. ८) - ४०.७

  • सोमवार - ३८.६

  • मंगळवार - ३७.६

  • बुधवार (ता.११) - ३६.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT