पुणे

कोपर्डे हवेली : उन्हाळी शिबिराची सांगता...

CD

बनवडीत उन्हाळी शिबिराची सांगता

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण; विविध उपक्रम उत्साहात

कोपर्डे हवेली, ता. ९ : शिक्षण मंडळ, बनवडीचे जागृती विद्यामंदिर व संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर, बनवडी येथे आयोजित उन्हाळी शिबिराची सांगता उत्साहात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी हायस्कूल, मसूर येथील उपशिक्षक राजेंद्र जाधव उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण झाले.
यावेळी श्री. जाधव यांनी सांगितले, की शिबिरात घेण्यात आलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असून, त्याचा फायदा त्यांच्या भावी जीवनात निश्चितच होईल. त्याचबरोबर शाळेचा गुणात्मक दर्जाही उंचावलेला दिसून येईल.
शिबिरादरम्यान माती काम, हॉर्स रायडिंग, स्वीमिंग, चित्रकला, कागदकाम, वक्तृत्व कला, बालसंस्कार, अभिनय कला यांसह विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात आले. लेझीम व गजी नृत्याचाही समावेश होता.
कार्यक्रमात कला दिग्दर्शक व अभिनेता वासू पाटील (चांडाळ चौकडी फेम) यांनी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळ घेतले. यात प्रथम १० क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व कृष्णाई पार्क येथे एक दिवस मोफत फनी गेम्सची संधी देण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकरराव खापे, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव बी. बी. कोठावळे, विनायक माळी यांच्यासह संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. व्ही. के. जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT