Summer effect milk production goes down dairy business pune  sakal
पुणे

Pune News : पुणे जिल्ह्यात भर उन्हाळ्यातही यंदा दूध उत्पादन "जैसे थे"

पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना यंदाचा उन्हाळा पावला

गजेंद्र बडे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : उन्हाळा सुरू झाला की, हिरवा चारा, पाणी कमी होणार. याचा फटका दूध उत्पादनाला बसणार आणि उन्हाळ्यात दूधाचे उत्पन्न कमी होणार, हे दशकानुदशकांपासून हमखास कानावर पडणारे वाक्यं यंदा पहिल्यांदाच इतिहासजमा झाले आहेत.

कारण यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील दूध उत्पादनात घट तर सोडाच, उलट त्यात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे भर उन्हाळ्यातही दूध उत्पादन वाढले, हे नवीन वाक्य यंदा जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या तोंडून ऐकायला मिळू लागले आहे. यामुळे दूध उत्पादकांना यंदाचा उन्हाळा पावला आहे.

दरम्यान, यामुळे पुणेकरांना यंदा दूध टंचाईला सामोरे जावे लागणार नाही आणि दरवाढीने दूध पोळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दूध उत्पादन हवे असेल तर, दुभत्या जनावरांना हिरवा चारा, पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळणे आवश्यक असते. उन्हाळ्यात नेमके हे दोन्ही घटक कमी होत असतात, हा आजवरचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

पण यंदाचे वर्ष या अनुभवाला अपवाद ठरले असल्याचे वयोवृद्ध दूध उत्पादक शेतकरी आश्रुबा जाधव सांगत होते. यंदा हिरवा चारा बक्कळ आहे आणि पाण्याचीबी वाणवा नाही. त्यामुळं यंदाच्या उन्हाळ्यात दूध उत्पादन कमी न होता, नेहमीप्रमाणे कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही वस्तूचे दर हे मागणी, पुरवठा आणि उत्पादन खर्चावर आधारित असतात. यानुसार उन्हाळ्यात पाण्याअभावी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन कमी होते. यामुळे दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा चारा मिळत नाही. शिवाय अपुऱ्या चाऱ्यामुळे हिरवा चारा महाग होत असतो.

चारा महागला की उत्पादन खर्चात वाढ आणि अपुऱ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादनात घट, असे सर्रास चित्र दूध उत्पादकांच्या बाबतीत आतापर्यंत दरवर्षी उन्हाळ्यात पहावयास मिळत असे. याचा परिणाम दूध वाढ होण्यात असे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काहीच घडलेले नाही. उलट यंदाच्या उन्हाळ्यात दूध उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच हे चित्र निर्माण झाल्याचे महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

दूध आयातीचा निर्णय स्थगित

राष्ट्रीय दूग्ध विकास मंडळाने (एनडीडीबी) दूध पावडर आणि बटर (लोणी) हे दोन दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. यानुसार केंद्र सरकारने प्रत्येकी दहा हजार मेट्रिक टन पावडर आणि बटर आयात करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु केंद्र सरकारने आता हा निर्णय पुर्णपणे स्थगित केला आहे.

आयातीच्या भीतीने पावडर, बटरच्या दरात घसरण

दरम्यान, दूध पावडर आणि बटरची आयात करण्याच्या हालचालींचा फटका या दोन्ही दूग्धजन्य पदार्थांच्या दराला बसला आहे. हे दोन्ही पदार्थ आयात होणार, या भीतीने या दोन्हींच्या दरात प्रत्येकी प्रति किलो ३० ते ४० रूपयांनी घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT