Cloudy Weather sakal
पुणे

Pune Weather : खेळत्या हवेमुळे उकाड्यापासून दिलासा! जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता कायम

विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस कोसळला. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस कोसळला. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम शहरासह संपुर्ण जिल्ह्याच्या वातावरणावर झाला असून, तापमानात चढ उतार कायम आहे. कमाल तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असले, तरीही खेळत्या हवेमुळे पुणेकरांची उकाड्यापासून सूटका झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभर प्रामुख्याने आकाश निरभ्र होते. तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानही पाहायला मिळाले. दुपारी बहुतांश ठिकाणी खेळती हवा पाहायला मिळाली. किमान तापमान १९ अंश सेल्सिअस तर कमाल तापामान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील आठवडाभर तरी संपूर्ण जिल्ह्यात आकाश मुख्यत- निरभ्र राहून संध्याकाळी ढगाळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात उन्हाची तीव्रताही कायम राहणार आहे.

आग्नेय राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती वरील प्रणालीत मिसळून गेली आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यात ढगाळ आकाश होत आहे. विदर्भात कमाल तापमानातील घट कायम आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे.

यलो अलर्ट -

राज्यात पावसाला अनुकुल हवामान असल्याने गुरूवारी (ता. ११) विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

- लवळे, शिरूर, वडगावशेरी, कोरेगाव पार्क - ४१.२

- पुरंदर, राजगुरूनगर, हडपसर, खेड, इंदापूर - ४०.१

- चिंचवड, शिवाजीनगर, पाषाण - ३९.५

- बारामती, तळेगाव, गिरवणे, हवेली, - ३८.४

- आंबेगाव, दौड, भोर -३७.८

- नारायणगाव, माळिन, निमगीरी - ३६.७

- लोणावळा - ३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough-Based TB Detection Using AI: खोकल्याच्या आवाजावरूनच कळणार क्षयरोग! ‘AI’मुळे आरोग्य सेवेत मोठी क्रांती

Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

SCROLL FOR NEXT