पुणे

रखरखत्या उन्हात फुलांची मोहिनी 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - रखरखत्या उन्हात रस्त्याच्याकडेला बहरलेली फुले मन मोहून टाकत आहे. शहरात ठिकठिकाणी बहावा, गुलमोहर, नीलमोहर, बोगनवेल, पळस, गोल्डनशॉवर, जारूल या झाडांची बहरलेली फुले लक्ष्यवेधी ठरत आहेत. 

लॉकडाउनमुळे सर्वच ठप्प आहेत. वाहतूक नसल्याने वातावरण प्रदूषणविरहित आहे. मात्र, उन्हाचा चटका वाढू लागला आहे. अशा रखरखत्या उन्हात रस्त्याच्याकडेला, मध्यभागी किंवा दुतर्फा फुले बहरली आहेत. ते मोकळ्या रस्त्यांवर खूपच आल्हाददायक आणि लक्ष्यवेधी ठरत आहेत. सध्या या फुलांचा नजराणा शहरात ठिकठिकाणी दृष्टीस पडत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या बाबत उद्यान विभागाचे प्रमुख दत्तात्रेय गायकवाड म्हणाले, ‘‘हवेतील कार्बनचे प्रमाण कमी झाल्याने शुद्ध ऑक्‍सिजनच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावरील उष्मा कमी झाल्याने वनस्पतींची पोषक वाढ झाली आहे. नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करून बदलत्या मोसमाचा आनंद घेत आहेत.’’ 

कुठे आहे हे सौंदर्य 
नवी सांगवीतील नर्मदा गार्डन परिसरात हलका गुलाबी म्हणजेच टॅबुबियाची फुले लक्ष वेधून घेत आहेत. हेच दृश्‍य औंध-रावेत परिसरात नजरेस पडत आहे. टेल्को एसकेएफरोड येथील पांढरी बोगनवेल व इंद्रायणीनगरमधील नीलमोहर आकर्षक दिसत आहेत. प्राधिकरणातील विविधरंगी पळसदेखील जाता-येता सर्वांना खुणावत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT