IMD Weather Forecast sakal
पुणे

IMD Weather Forecast : उन्हाळा ठरणार अधिक तापदायक ; ‘आयएमडी’कडून एप्रिल ते जून दरम्यानचा हवामान अंदाज जाहीर

यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उन्हाळा अधिक तापदायक ठरणार असून तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला. यावेळी पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया विभागाचे मंत्री किरेन रिजिजू, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख कमल किशोर उपस्थित होते.

यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे. पूर्व भारत आणि पूर्वोत्तर राज्यांसह वायव्य भारतात मात्र कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण द्वीपकल्प, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून महिन्यात साधारणतः ८ ते १० उष्ण दिवस असतात. यंदा मात्र सलग १० ते २० उष्ण दिवस अनुभवायला मिळण्याचा इशारा आहे. यात गुजरात. मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशात तीव्र उष्ण लाटांची शक्यता आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या तीव्र ‘एल - निनो’ स्थिती आहे. एप्रिल-मेमध्ये ‘एल - निनो’ स्थिती कायम राहणार असून जूनमध्ये महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसामान्य पातळीवर येणार आहे.

एप्रिल महिन्यात तीव्र लाट शक्य

एप्रिल महिन्यात राज्यासह देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. यात सलग २ ते ८ दिवस उष्ण राहण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटांचा इशारा आहे.

मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही उष्ण लाटा अनुभवायला मिळणार आहेत. गुजरात, उत्तर कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातही उष्ण लाटांचा इशारा देण्यात आला आहे. देशात पुढील तीन महिन्यांत तीव्र उष्ण लाटा येऊ शकतात याच काळात निवडणुका होत आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच जागृती आवश्यक आहे.

- किरेन रिजिजू, मंत्री, पृथ्वी विज्ञान मंत्रालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : संसद परिसरात एनडीए, इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन सुरू

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT