पुणे

प्रत्येकाने योगाची ही सवय लावून स्वतःचे आरोग्य जपावे,” नगराध्यक्षा आवताडे

CD

MGV26B15194
मंगळवेढा : जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्या महिला.

प्रत्येकाने स्वतः:ला योगाची सवय लावून आरोग्य जपावे
.........
नगराध्यक्षा सुनंदा आवताडे; मंगळवेढ्यात सूर्यनमस्कार स्पर्धा
........
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २५ : चांगल्या आरोग्यासाठी मी दररोज न चुकता प्राणायाम आणि सूर्यनमस्काराचा सराव करते. त्यामुळे आजही मला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास नाही, प्रत्येकाने योगाची ही सवय लावून स्वतःचे आरोग्य जपावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी केले.
जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने निरामय जीवन योगालय मंगळवेढा यांच्या वतीने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी लक्ष्मी महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा सुभदाताई पटवर्धन, योग शिक्षक नितीन मोरे, संतोष दुधाळ उपस्थित होते. पतंजली योग परिवाराच्या योगशिक्षिका नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी भारतीय संस्कृती जपत सूर्यनमस्कार घालत उपस्थित सर्वांनाच आश्चर्यचकित केले. नगराध्यक्षा असूनही त्यांनी स्वतः मैदानात उतरून सूर्यनमस्कार केल्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण केले. स्वतः सहभाग नोंदवत संपूर्ण मंगळवेढा वासीयांना योग व आरोग्याचा मोलाचा संदेश दिला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून योग शिक्षक आगतराव बिले व योग शिक्षिका कविता दुधाळ यांनी काम पाहिले. या स्पर्धेत बाळू चेळेकर, संतोष येनपे, नागेश राऊत, मिलिंद कुलकर्णी, भीमसेन माळी, बंडू पाटील, प्रा. राजकुमार पवार, डॉ. अनिल यादव, पवन बजाज, दत्तात्रय दुधाळ यांच्यासह महिलांमधून रुक्मिणी बिले, लक्ष्मी भीमदे, योगिता शिंदे आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.

स्पर्धेतील विजेते
लहान गट : आदित्य पाटील (प्रथम), सुमीत दुधाळ (द्वितीय), पुरुष गट : बाळासाहेब मासाळ (प्रथम), प्रा. डॉ. संतोष फटे (द्वितीय), बाळकृष्ण बळवंतराव (तृतीय), महिला गट : १६५ शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार करत विभागून प्रभा कोकरे व सोनाली शरद भोसले (विभागून प्रथम), राजश्री आवताडे व लता शिंदे (द्वितीय विभागून), ज्योती कारंडे व जयश्री भगरे(तृतीय विभागून)
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT