poona-hospital-and-sakal.jpg 
पुणे

आरोग्य समस्या तुमच्या, उत्तरे आमची ! 

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः तुम्हाला वारंवार सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय? हवामान बदलल्यानंतर तुमचा श्‍वास वाजतो? विशेषतः पावसाळ्यात, ढग दाटून आल्यानंतर किंवा हिवाळ्यात तुम्हाला श्‍वसनाचे वेगवेगळे त्रास जाणवतात? या प्रश्‍नांची उत्तरे "हो' असल्यास हे का होते? त्याचं नेमकं निदान काय? तुम्हाला या समस्या टाळता येतील का? या तुमच्या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला तज्ज्ञांकडून आता मिळणार आहेत. फक्त तुम्हालाच असं नाही तर, तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला, जवळच्या नातेवाइकाला, प्रिय मित्राला होणाऱ्या या त्रासावर तुमचं नक्की बोलणं झालं असेल. त्यामुळे या समस्येच्या मुळापर्यंत पोचण्यासाठी "पूना हॉस्पिटल' आणि "सकाळ' यांनी "प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. 

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात रविवारी (ता. 25) सायंकाळी सहा वाजता या समस्येवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यात पूना हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन डॉ. नितीन अभ्यंकर, पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अजित कुलकर्णी श्रोत्यांशी संवाद साधतील. पुण्यातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती "महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर हे देणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्‍यक आहे. 

काय : आरोग्य समस्या तुमच्या, उत्तरे आमची ! 
कधी : रविवार, 25 ऑगस्ट 
केव्हा : सायंकाळी 6.00 वाजता 
कोठे : न्यू इंग्लिश स्कूल सभागृह, टिळक रोड 
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: किरण : 8766424992 किंवा देवराज 9403633300. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT