Baramati Loksabha Constituency sakal
पुणे

Baramati Loksabha Constituency : बारामतीची सून तुमचे ऋण फेडणार : सुनेत्रा पवार

तुमच्या वहिनीला नक्कीच तिच्या जबाबदारीची जाणीव आहे. एका मोठ्या पर्वाची सुरुवात मी आज करत आहे. आपला विजय निश्चित आहे.

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी : तुमच्या वहिनीला नक्कीच तिच्या जबाबदारीची जाणीव आहे. एका मोठ्या पर्वाची सुरुवात मी आज करत आहे. आपला विजय निश्चित आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची ही सून आपल्या जनतेचे ऋण फेडणार आहे, असा निर्धार महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केला.

कण्हेरी येथे शनिवारी (ता.२०) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील मारुती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. पवार पुढे म्हणाल्या, काटेवाडी-कण्हेरी गावापासूनच माझ्या समाजकारणाची सुरुवात झाली आहे. तुम्ही मला जो विश्वास दिला त्या आधारावर तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. दादा नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

माझ्या कामात त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. येथून पुढे देखील ते माझ्या पाठीशी राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेली कामे जगासमोर आहेत. त्यामुळे सबंध जनतेत मोदी एके मोदी असाच नारा आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक जनकल्याणकारी योजना राबवल्या आहेत. अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मतदान करा, असे यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या.

व्यापक हितासाठी मी थांबलो: विजय शिवतारे

स्थानिक पातळीवरील हेतू ठेवून मी काम केले तर महायुतीचे नुकसान होईल. सुरुवातीचा काळ अडचणीचा होता. वैयक्तिक वाद, मतभेद असतात पण मनभेद नाहीत. व्यापक हितासाठी मी थांबलो, अशा शब्दात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपली भूमिका बारामतीकरांसमोर मांडली. ते पुढे म्हणाले, ही निवडणूक भावनात्मक बाजूने नाही.

नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे. स्थानिक पातळीवर मी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरून जर काम केले तर संपूर्ण राज्यातील महायुतीला तडा जाईल. पन्नास वर्षापासून बारामती पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न कायम आहे. याबाबत मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बोललो. यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. वैयक्तिक सगळे वाद मतभेद सोडून मी आता अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे यावेळी विजय शिवतारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

व्होट चोर, गद्दी छोड! काँग्रेसच्या भारत समिटमध्ये इटलीच्या नेत्यानं दिली घोषणा, नेमकं काय घडलं?

Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

EV Bus Scooty Accident : इलेक्ट्रिक बस-स्कुटीची भीषण धडक! पैठण महामार्गावर महिलेचा बळी; दोघे गंभीर जखमी

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

SCROLL FOR NEXT