Sunetra Pawar will do extensive work on cataract surgeries health pune baramati sakal
पुणे

मोतीबिंदू शस्त्रक्रियांबाबत व्यापक काम करणार- सुनेत्रा पवार

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया भविष्यात अधिक व्यापक काम करणार

मिलिंद संगई, बारामती

बारामती : ज्येष्ठ नागरिकांमधील मोतीबिंदूच्या अधिकाधिक शस्त्रक्रिया करुन त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया भविष्यात अधिक व्यापक काम करणार असल्याची माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पुणे जिल्हा अंधत्व निवारण समितीच्या वतीने बारामतीत आयोजित मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या समारोपप्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या. ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. चंद्रकांत म्हस्के, डॉ. प्रकाश रोकडे, डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

शुक्रवार (ता. 20) व शनिवार (ता. 21) असे दोन दिवस डॉ. लहाने व डॉ. पारेख यांनी 408 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. या सर्व रुग्णांना डॉ. लहाने यांनी सूचना दिल्या. मोतीबिंदू शिबीराच्या निमित्ताने दाखल झालेल्या तब्बल 65 रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अतिरिक्त असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करता आली नसल्याची माहिती या प्रसंगी त्यांनी दिली.

आगामी काळात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरांची संख्या वाढविण्यासह या बाबत व्यापक काम करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले,या प्रसंगी रागिणी पारेख यांनीही मनोगत व्यक्त केले.

दरम्यान या शिबीरासाठी अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केल्याने हे शिबीर यशस्वी करु शकल्याचे सांगत त्या सर्वां प्रती सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रुग्णांवर शस्त्रक्रिया पश्चात सर्व तपासण्या, चष्मेवाटप व उपचार मोफत केले जाणार आहेत.

या शिबीरात सुनेत्रा पवार यांनी मोतीबिंदू निवारणाचे घेतलेले व्रत व डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांची त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा पाहून आम्ही शस्त्रक्रियेसाठी या शिबीरात आल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले.

अनोख्या स्नेहबंधाचे घडले दर्शन....

या शिबीराच्या निमित्ताने एका वयोवृध्द महिलेची व एका ज्येष्ठ पुरुषाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार होती. तपासणीपासून ते त्यांना घरी सोडेपर्यंत या महिलेचे पती व पुरुषाची पत्नी संपूर्ण वेळ त्यांची काळजी घेत त्यांच्याजवळ थांबून राहिली. उतारवयात या दोघांची आपल्या जोडीदाराप्रती घेतली जाणारी काळजी या शिबीरात चर्चेचा विषय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Paragliding World Cup 2026: पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग, युरोपची मक्तेदारी मोडीत!

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT