Sunita Godara Indian runner elated become elite sport Marathon pune  sakal
पुणे

Sunita Godara : भारतीय धावपटू एलिट बनल्याने अत्यानंद; सुनीता गोदारा

माजी मॅरेथॉनपटू सुनीता गोदारा यांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय धावपटूंना एलिट विभागात स्थान मिळणे आणि त्यांच्या कामगिरीला उत्स्फूर्त दाद मिळत असल्याने अत्यानंद होतो, अशी भावना माजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू तसेच समन्वयक सुनीता गोदारा यांनी व्यक्त केली. सुनीता गोदारा ६३ वर्षांच्या आहेत. मॅरेथॉनचे देशातील स्थित्यंतर त्यांनी अनुभवले आहे. आपला काळ आणि आताचा काळ याची तुलना करताना त्या म्हणाल्या की, मी १९८५ मध्ये राष्ट्रीय विजेती बनले. त्यावेळी मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार होती. लंडन किंवा बोस्टन असे दोन पर्याय माझ्यासमोर होते. यात मी बोस्टनला पसंती दिली. तेथे सहभागी महिला स्पर्धकांची संख्याच हजारच्या घरात होती. ते पाहून मी आश्चर्यचकित झाले.

पोर्तुगालची धावपटू रोझा मोटा हिच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. तेव्हा भारतात आम्ही फक्त वेगाने धावायचो. वर्कआऊट नावाचा प्रकार फारसा नव्हता. दमसास, क्षमता संवर्धन याची फारशी माहिती नव्हती. आता चित्र पालटले आहे. मुळात धावपटूंना आदर मिळतो. २००३ मध्ये दिल्ली हाफ मॅरेथॉनच्यावेळी आम्ही एलिट म्हणून भारतीय धावपटूंना मान दिला. भारतात पूर्वी निवडक शहरांमध्ये मॅरेथॉन व्हायच्या. आता प्रमुख शहरांसह निमशहरी भागांतही मॅरेथॉन होत आहेत. यामुळे भारतीय धावपटूंना रोख बक्षीस रक्कम कमावता येते, ही मोठी जमेची बाब असल्याचे सुनीता गोदारा यांना वाटते. त्या म्हणाल्या की, तुम्ही तीन फूल आणि तीन हाफ मॅरेथॉन केल्या तरी तुम्हाला काही लाख रुपयांची कमाई होऊ शकते. वयोगटांच्या समावेशामुळे बक्षीसे जिंकण्याची संधी आणखी वाढली. हौशी धावपटूंच्या सहभागामुळे धावण्याच्या शर्यतींत जणू काही क्रांतीच घडली.

पाण्यासह सारी व्यवस्था चोख

सकाळ आयोजित स्पर्धेच्या संयोजनाचे कौतुक करताना सुनीता गोदारा म्हणाल्या की, मुख्य स्टेडियमवर आयोजन झाल्यामुळे स्टार्ट आणि फिनिश पॉइंट वेगळे होते. हे फार चांगले झाले. त्यामुळे एका बाजूकडील स्थितीचा दुसऱ्या बाजूवर परिणाम झाला नाही. मी स्वतः अनेक स्पर्धा घेत असते. काही वेळा पिण्याच्या पाण्याचे नियोजन बिघडते. पाणी नाही अशी स्थिती निर्माण होते. येथे मात्र सगळी व्यवस्था अगदी चोख होती. पाणी, वैद्यकीय केंद्र, पदके, अशी केंद्रे जवळजवळ होती.

धावपटूंना प्राधान्य

सुनीता गोदारा देशात ठिकठिकाणी होणाऱ्या स्पर्धांसाठी त्या धावपटू पाठवितात. स्पर्धांची निवड करताना धावपटूंच्या सुविधांना प्राधान्य देते, असे नमूद करून त्या म्हणाल्या की, आम्हाला पंचतारांकित सुविधा नको असतात. स्पर्धेच्या ठिकाणापासून निवास व्यवस्था जवळ असावी, स्वच्छता असावी इतकीच अपेक्षा असते, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna : मोठी बातमी ! प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

भाड्याच्या घरात सापडलेला रवींद्र महाजनी यांचा मृतदेह; पत्नी- मुलासोबत का राहत नव्हते? हे होतं कारण

Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!

Astrological Prediction : उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील नेत्याची निवड ते राज्य मंत्रिमंडळातील बदल; काय सांगत राजकीय भविष्य? वाचा...

Education News : शिक्षक नाहीत तर शाळा कशाला?"; आदिवासी पालकांचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT