पुणे

सुप्यात सनईच्या सूरात रेखाटले चित्र

CD

सुपे, ता. १८ : सुपे (ता. बारामती) येथे सकाळच्या कोवळ्या उन्हात सनईच्या सुरात प्रसन्न वातावरणात छोटे चित्रकार विविध चित्रांच्या माध्यमातून भावविश्व साकारण्यात दंग झाली होती. येथील श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात भावी चित्रकार आपल्या कुंचल्यातून चित्र साकारत होते. राज्यस्तरीय सकाळ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सुपे परिसरातील शाळांचे विद्यार्थी सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी झाली होती. श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे, वसंतराव पवार माध्यमिक विद्यालय देऊळगाव रसाळ, न्यू इंग्लिश स्कुल नारोळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुदळेमळा, प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालय सुपे आदी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. बारामती तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे सुपे केंद्र प्रमुख शरद मचाले यांच्या हस्ते व उपस्थित विद्यार्थी प्रतिनिधींच्या उपस्थितीत सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेसाठी श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या एस. ए. लोणकर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख आर. डी. पानसरे, कलाशिक्षक वैभव लोणकर, प्रकाश शितोळे, मल्हारी वाघमारे, नवनाथ कुदळे, आकाश सकट, प्राजक्ता विशेष शाळेचे गणेश भुजबळ, प्राजक्ता बसाळे, गणेश बारवकर आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT