Supirya Sule believes Mahavikas Aghadi will reclaim power  sakal
पुणे

Supriya Sule : 'राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जाणार'

Supriya Sule : राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जाऊन महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार. असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

लोहगाव: राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जाऊन महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार. असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. लोहगाव येथील सुनील खांदवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

राज्यातील महायुतीचे सरकार कामापुरते असून लोकसभा निवडणुकांवेळी त्यांना लाडक्या बहिणी आठवल्या नाहीत. लोकसभेत पिछेहाट झाल्यानंतर त्यांना लाडक्या बहिणींची आठवण झाली. तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यावर दिड हजार रुपये देऊन तेलाचे दर वाढवले. अशी टिका सुळे यांनी केली.

याचबरोबर राज्यात सुरु असलेल्या महिला अत्याचारांच्या प्रकरणांवरुनही सुळे यांनी सरकार तसेच गृहखात्यावर ताशेरे ओढले. पोर्शे कार प्रकरणात नाव आलेल्या टिंगरेंचाही त्यांनी समाचार घेतला. चूकीच्या गोष्टींची पाठराखण करणाऱ्यांच्या विरोधात लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना न्याय मिळून देण्यासाठी एक आई म्हणून प्रयत्न करेल. असे त्या म्हणाल्या.

बाळासाहेबांनी त्यांच्या पश्चात उद्धव यांना आपला उत्तराधिकारी ठरविले होते. त्यामुळे उद्धव यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचे मी मानते. असे त्या म्हणाल्या. दिल्लीश्वरांनी कितीही त्रास दिला तरी मोडेन पण वाकणार नाही; आणि असत्याची सोबत कधीही करणार नाही.

असे त्यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नानासाहेब नलावडे, राजेंद्र खांदवे, सागर खांदवे, निलेश पवार, नीता गलांडे, स्वाती पोकळे तसेच पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT