‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड्स’चे दिमाखदार वितरण sakal
पुणे

Pune : कृषी उद्योजकतेला पाठबळ- दादा भुसे

‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड्स’चे दिमाखदार वितरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकऱ्यांची मुले शून्यातून विश्‍व निर्माण करीत उद्योजक म्हणून पुढे येत असल्याचे चित्र गौरवास्पद आहे. या उद्योजकांनी आता शेतकरीहिताच्या संकल्पना सरकारला कळवाव्यात. राज्य शासनदेखील ‘सकाळ ॲग्रोवन’च्या माध्यमातून कृषी उद्योजकतावाढीसाठी पाठबळ मिळवून देईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. निमित्त होते ते दिमाखदार अशा ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स’ वितरण सोहळ्याचे.

पुण्यात बुधवारी (ता.२७) सायंकाळी एका दिमाखदार सोहळ्यात कृषी उद्योग क्षेत्रातील निवडक उद्योजकांना तुतारीचा निनाद आणि टाळ्यांच्या गजरात गौरविण्यात आले. पुरस्कार्थींमध्ये खते, बियाणे, कीडनाशके, सूक्ष्मसिंचन, यंत्रे-अवजारे, रोपवाटिका अशा विविध क्षेत्रांत कर्तबगारी दाखविणाऱ्या शेतकरीपुत्र उद्योजकांचा समावेश होता. व्यासपीठावर ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे समूह संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते.

कृषिमंत्री म्हणाले, ‘‘केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये दीर्घ कालावधीचे आराखडे करण्याचा प्रयत्न राहील. मुळात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यक्तिशः शेतकऱ्यांचा उल्लेख अन्नदाता, अन्नदेवता म्हणून करतात. त्यामुळेच ‘पिकेल ते विकेल’ हे धोरण सरकारने स्वीकारले. विविध योजना आम्ही एकाच छताखाली आणतो आहोत. पीकविमा, ‘महाडीबीटी’मधील त्रुटी सोडविल्या जात असून, भ्रष्टाचाराला संधी न मिळता थेट लाभार्थ्यींपर्यंत योजना नेत आहोत. गरीब शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट, अन्न प्रक्रिया अशा प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी आराखडे तयार केले जात आहेत. या वाटचालीत ‘ॲग्रोवन’ने आम्हाला आणखी मार्गदर्शन करावे.’

कृषी व्यावसायिकता धोरणात सहभागी होऊ: पवार

‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनीही उद्यमशील पुरस्कार्थींचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘मुलांना, तरुणांना सुरुवातीपासूनच कामाची सवय, संधी आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. आम्ही भावांनी देखील भाज्या विकल्या. त्या अनुभवातूनच व्यवसायात यशस्वी होऊ शकलो. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात असे प्रशिक्षण किंवा कामाच्या संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची भूमिका ‘सकाळ माध्यम समूहा’ने ठेवली आहे. त्यातूनच सरपंच महापरिषद, शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण, टाटा-गुगलच्या माध्यमातून पावणेपाच लाख महिलांना इंटरनेटचे प्रशिक्षण असे विविधांगी उपक्रम आम्ही राबवीत आहोत.’’

शेतकऱ्यांनी बंगल्यांना दिले ‘ॲग्रोवन’ नाव

कृषी प्रगतीसाठी गेल्या १६ वर्षांची ‘ॲग्रोवन’ची वाटचाल आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट करताना ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी ‘ॲग्रोवन''मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असून, आजवर राज्यातील चार शेतकऱ्यांनी आपल्या बंगल्याचे नाव ‘ॲग्रोवन’ ठेवले आहे, असे सांगितले. तसेच कृषी उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने नेमके काय करायला हवे, याचा धांडोळा घेतला. कृषिमंत्र्यांनी तोच धागा पकडून प्रत्येक मुद्द्यावर मनमोकळी भूमिका मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT