Pune crime  esakal
पुणे

Crime : रिल्सवर गुन्हेगारीचे समर्थन तरुणाला पडले चांगलेच महागात; पोलिसांनी घेतले ताब्यात

सध्या काहीजण रिल्स तयार करून सोशल मीडियावर टाकत असतात. परंतु गुन्हेगारीचे समर्थन करणारे रिल्स सोशल मीडियावर टाकणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सध्या काहीजण रिल्स तयार करून सोशल मीडियावर टाकत असतात. परंतु गुन्हेगारीचे समर्थन करणारे रिल्स सोशल मीडियावर टाकणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर या तरुणाने व्हिडिओद्वारे माफी मागितली.

महम्मदवाडी येथील तरवडे वस्तीमधील एका २० वर्षीय तरुणाने रिल्स तयार करुन सोशल मीडियावर प्रसारित केले होते. ‘हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते’ असे रिल तयार करून पोलिसांना आव्हान दिले होते.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर युनिट सहाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी सोशल मीडियावर गुन्हेगारीचे स्टेटस ठेवणाऱ्या त्या तरुणाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तो तरुण शिंदे वस्तीत थांबल्याची माहिती पोलिस अंमलदार नितीन मुंढे यांना मिळाली. पोलिसांनी त्या तरुणाला शिंदे वस्तीतून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे लोखंडी हत्यार आढळून आले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल यांनी दिली. दरम्यान, त्या तरुणाने व्हिडिओद्वारे माफीनामा तयार करून दिला. ‘मी गुन्हेगारीचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला. त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. यापुढे अशी चूक होणार नाही,’ असे त्या तरुणाने माफीनाम्यात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT