support to Supriya Sule of Vanchit Bahujan Aghadi in Baramati lok sabha election Sakal
पुणे

Supriya Sule : बारामतीत वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मिलिंद संगई बारामती

बारामती : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून बारामतीत कोणताही उमेदवार उभा न करता खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे वतीने घेण्यात आला आहे. बारामतीत वंचित बहुजन आघाडीची ताकद या निर्णयामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत उभी राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर यांनी यावे यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. मात्र त्यात यश न आल्याने वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली होती.

बारामतीत वंचित बहुजन आघाडी काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीत उमेदवार उभा न करता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची ताकद या निवडणुकीत राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

Pachod Accident : दुचाकींची समोरासमोर धडक; तिघे जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates Live : जळगावच्या एरंडोल येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात पडलेल्या खड्ड्यामुळे चालकांसह प्रवासी त्रस्त

OBC Quota Conflict: सक्षम खातील, दुर्बल बघत राहतील... मूळ ओबीसींच काय होणार? नेपाळसारखी परिस्थिती अन्...; आरक्षण अभ्यासकांचा इशारा

Digital Minister: मंत्रिपदाची जबाबदारी 'एआय'वर; टेंडर्सवर ठेवणार नजर, भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT