आधार कार्डबाबातची याचिका फेटाळली
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २४ ः मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) मोहिमेवेळी आधार कार्ड हा पुरावा कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आवश्यक कागदपत्रांतून आधार कार्ड हटविण्याचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
लोकप्रतिनिधित्व कायद्यात आधार कार्डला मान्यताप्राप्त कागदपत्र म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारकडे दाद मागा, असे सांगत सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमल्या बागची आणि न्या. विपुल पांचोली यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.
‘‘देशात मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड बनले आहेत. विशेषतः सीमाभागात पकडण्यात आलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांकडे पश्चिम बंगालमधून जारी करण्यात आलेले आधार कार्ड सापडले आहेत,’’ असा मुद्दा ॲड. अश्विनी उपाध्याय यांनी मांडला. यावर, ‘‘जर मोठ्या प्रमाणात बनावट आधारकार्ड बनवले गेले असतील तर सरकारी पातळीवर यावर नियंत्रण घातले जाणे आवश्यक आहे,’’ अशी टिपणी न्या. बागची यांनी केली. ‘‘बनावट आधार कार्डचा मुद्दा गंभीर असू शकतो तसेच या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जाऊ शकतो, मात्र तूर्तास आपण यावर कोणतीही टिपणी करणार नाही,’’ असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले. आधार कार्डचा दुरुपयोग होत असल्याचे वाटत असेल यााचिकाकर्ते लोकप्रतिनिधित्व कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केंद्राकडे करू शकतात, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.