न्यायालयाचा अवमानप्रकरणी
वकिलावर कारवाईची मागणी
सरन्यायाधीशांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य; वकील संघटनेची याचिका
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर (पीटीआय) : सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वकिलावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी (ता. १८) सुनावणी घेणार आहे.
सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेने (एससीबीए) दाखल केलेल्या या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मंगळवारी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. संघटनेच्या सचिव प्रज्ञा बागेल आणि सहसचिव मिनीष दुबे यांनी ही विनंती केली. संबंधित वकिलाविरोधात फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्यासाठी महाधिवक्ता आर. व्यंकटरमणी यांची संमती मिळाल्याचे त्यांनी खंडपीठाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने बुधवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन कक्षात हा प्रकार घडला होता. न्यायव्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराबाबत आपण २ नोव्हेंबरला सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला पत्र पाठवले होते; मात्र त्यावर उत्तर मिळाले नसल्याचा दावा संबंधित वकिलाने केला. या विषयावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्याने केली. यावर न्यायाधीश मोहना यांनी अशा प्रकारे विषय उपस्थित करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. वकिलाने आग्रह कायम ठेवल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्याला प्रतीक्षा करण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही वकिलाने सरन्यायाधीशांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. ‘‘तुम्ही त्या पदावर बसण्यास पात्र नाही,’’ अशा शब्दांत त्याने सरन्यायाधीशांना उद्देशून कथित वक्तव्य केले. त्यानंतर त्याला न्यायालयीन कक्षातून बाहेर नेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.