पुणे

रोजंदारी कामगारांना कायम करण्याचे आदेश

CD

‘सिव्हिल’च्या रोजंदारी कामगारांना कायम सेवेत घ्या
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; उच्च न्यायालयाचा निकाल ठेवला कायम

सोलापूर, ता. २१ ः येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९५ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. या रोजंदारी कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत.
या रोजंदारी कामगारांनी २०१८ मध्ये औद्योगिक न्यायालयात कायम सेवेत घेण्याबाबत तक्रार दाखल केली होती. १९ डिसेंबर २०२४ रोजी औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाच्या विरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाच, ऑक्टोबर २०२५ मध्ये राज्य सरकारने या कामगारांच्या निकालाकडे दुर्लक्ष करत नवीन १५३ पदांच्या भरतीची जाहिरात काढली. याविरोधात कामगारांनी डिसेंबर २०२५ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. यामध्ये १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत उच्च न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आणि राज्य सरकारच्या ९५ रिट याचिका फेटाळून लावल्या होत्या. उच्च न्यायालयाने रिक्त जागांवर या कामगारांची सेवा नियमित करून त्यांना अनुषंगिक फायदे देण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्य शासनाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटीशन याचिका दाखल केली. त्याची ता. १८ रोजी अंतिम सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत राज्य शासनाची स्पेशल लिव्ह पिटीशन याचिका फेटाळून लावली.
कामगारांच्या वतीने ॲड. नसीर माशाळवाले, तर उच्च न्यायालयात ॲड. एम. एस. टोपकर, ॲड. डॅनियल धनवडे, ॲड. मार्क धनवडे, ॲड. भार्गवी पाटील, ॲड. नीव पाटील, ॲड. मनोलकर यांनी बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयात ॲड. अमोल चितळे, ॲड. प्रग्या बागेल, ॲड. सार्थक शर्मा, ॲड. डॅनिएल धनवडे यांनी काम पाहिले.

कोट
“सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आदेशानुसार निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.”
प्रशांत मुळे, अध्यक्ष, रोजंदारी कर्मचारी संघटना, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला! दर नियंत्रणासाठी सरकारने उचलली कठोर पावलं; इथेनॉलमुळे खरंच भाव वाढले?

नवे-जुने मराठी चित्रपट आणि वेबसीरिज एकाच OTTवर; ‘८ वाजून १३ मिनिटे’ ते ‘कैरी’पर्यंत पाहा काय खास

Marathi News Live Updates : दिल्ली पोलिसांनी 'रॅपिड ॲक्शन फोर्स'च्या मदतीने जंतरमंतरवर जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले

कमाल अमरोहींच्या प्रेमात होत्या मधुबाला; लग्नासाठी दिलेली 'ही' ऑफर, म्हणाल्या- पत्नी मुलांना सोडून द्या, मी तुम्हाला...

Karad Crime : कऱ्हाडला महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून निर्घृण खून; खून केल्यानंतर संशयीत पोलिसात हजर

SCROLL FOR NEXT