पुणे

टीव्हीके आमदार

CD

टीव्पहीके आमदार सेतूपती यांना
सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली, ता. १३ (पीटीआय) : तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) आमदार आर. श्रीनिवास सेतूपती यांना तमिळनाडू विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावात सहभागी होण्यास मनाई करणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. न्यायाधीश विक्रमनाथ, संदीप मेहता आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘‘निवडणुकीच्या वादासाठी निवडणूक याचिका हा पर्याय असतानादेखील कलम २२६ अंतर्गत याचिका कशी काय दाखल करून घेतली?’’ असा सवालही खंडपीठाने केला.
सेतूपती यांनी तिरुपत्तूर मतदारसंघातून द्रमुकचे उमेदवार के. आर. पेरियाकरुप्पन यांचा एका मताने पराभव केला होता. पेरियाकरुप्पन यांनी टपाली मतपत्रिका आणि ईव्हीएम मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने सेतूपती यांना विश्वासदर्शक ठरावातील मतदानापासून रोखले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्या आदेशाला बुधवारी स्थगिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुरूडमध्ये नानांच्या आठवणींना उजाळा, काय म्हणाले? |

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांच्या चाहत्यांची अंत्यसंस्कारासाठी गर्दी

आठवणीतील भेट : पेट्रोल पंपावरचा तो मुलगा नानांना पाहतच बसला...

Nana Patekar :अंगावर काटा आणणारा संघर्ष ! नानांचा संपूर्ण जीवनप्रवास !

SCROLL FOR NEXT