supriya sule dhanjay munde 
पुणे

सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारे साजरा केला धनंजय मुंडे यांचा वाढदिवस; व्हिडिओ पाहाच

सकाळवृत्तसेवा

 पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे स्पेशल ठरला. कारण, सुप्रियाताईंनी बारामतीतील घरी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. तसेच, या वेळी खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या या कार्यकर्त्याला हाताने केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील एक लोपप्रिय नेते आहेत. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. आपल्या वकृत्व शैलीच्या जोरावर त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात स्थान मिळविले आहे. चुलते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील नेत्यांनी त्यांचा योग्य सन्मान राखत विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेतेपद बहाल केले. त्यानंतर त्यांनी प्रचंड मेहनत घेत राज्यभरात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. विधान परिषेदेत सरकारला वेळोवेळी खिंडीत पकडले. तसेच, स्वतःच्या बीड जिल्ह्याला पक्षाचा बालेकिल्ला केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अनेकांनी कोंडी केलेली असतानाही दमदार विजय संपादन केला. त्यानंतर राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर त्यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली.

मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरवात केली होती. तसेच, राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटात त्यांनी पायाला भिंगरी लावत जनतेची सेवा केली. मात्र, त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. याही संकटाला तोंड देत त्यांनी कोरोनावर विजय मिळविला. त्यामुळे यंदाचा त्यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचे कार्यकर्त्यांचे नियोजन होते. परंतु, राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. मुंडे यांचा काल वाढदिवस होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्यापासून अनेक मंत्री व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

आज धनंजय मुंडे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांना जणू वाढदिवसाचे सरप्राईज गिफ्ट दिले. त्यांनी या भेटीवेळी केक कापून मुंडे यांचा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे स्वतः शरद पवार यांनीही आपल्या या कार्यकर्त्याला आपल्या हाताने केक भरवला. मुंडे यांनी त्यावेळी पवारसाहेब यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी प्रतिभाताई पवार, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, कन्या रेवती आदी उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी हा रंगलेला सोहळा फेसबुक लाइव्हद्वारे आपल्या कार्यकर्त्यांसोबत शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT