supriya-sule. 
पुणे

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणार - खासदार सुप्रिया सुळे

आदम पठाण

वडापुरी - रेडणी (ता. इंदापूर) परिसरात दहावी नंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गावात शाळेची सोय नसल्याने मुलींचे शिक्षण अर्धवट राहत असल्याने, मुलींच्या शिक्षणासाठी गावात अकरावी-बारावीची सोय व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी करताच खासदार सुप्रिया यांनी शिक्षणाला प्राधान्य देवून मुलींचे शिक्षण  पूर्ण व्हावे यासाठी रेडणी येथे कॉलेजची सोय करणार असून पाच वर्ग खोल्या देणार असल्याचे गाव भेटी वेळी आयोजित केलेल्या सभेवेळी सांगितले.

यावेळी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले, तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, युवक तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, रहेना मुलाणी, विजयराव शिंदे, डी एन जगताप, बाळासाहेब चव्हाण, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले उपस्थित होते. 

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिला व मुलींचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे नागरिकांच्या असलेल्या समस्या व कामाबद्दल आपुलकीने चौकशी केली. काटी, रेडा, रेडणी, जाधववाडी परिसरात रस्ते, वीज व आरोग्य याची कामे झाल्याने या परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे.  आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात निधी या परिसरात दिल्याने गावाची विकास कामे झाली आहेत त्यामुळे दोघांचे सुळे यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले. यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींन बद्दल बोललेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी हरिभाऊ तरंगे किसन खाडे  आण्णा काळे अशोक निकम सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नाना तरंगे यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT