Supriya Sule Sakal
पुणे

Supriya Sule : मुंबईतील गोळीबाराच्या घटनेने "अब की बार गोळीबार सरकार'वर शिक्कामोर्तब - सुप्रिया सुळे

"सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता, आता मुंबईत भर रस्त्यावर गोळीबार होत आहे. ही गंभीर बाब असून अशा घटनांमुळे "अब की बार गोळीबार सरकार' या मी पुर्वी केलेल्या वक्तव्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.''

सकाळ वृत्तसेवा

Pune News : "सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता, आता मुंबईत भर रस्त्यावर गोळीबार होत आहे. ही गंभीर बाब असून अशा घटनांमुळे "अब की बार गोळीबार सरकार' या मी पुर्वी केलेल्या वक्तव्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.''

अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप महायुती सरकारवर रविवारी टीका केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन येथील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास सुळे यांनी रविवारी सकाळी साडे आठ वाजता अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावरील गोळीबाराच्या घटनेबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, ""ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. पोलिस ठाण्यात गोळीबार करण्यापर्यंत ते हिम्मत करत असतील, तर रस्त्यावर गोळीबार करण्याच्या प्रकाराबाबत सत्ताधाऱ्यांना काहीही वाटणार नाही.

सुसंस्कृत पुण्याला कोयता गॅंग माहिती नव्हती, पण आज ही गॅंग डोके वर काढते. त्यावर कायमस्वरुपी निर्णय का होत नाही ? महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे.''

शरद पवार यांच्याविरुद्ध कटकारस्थान

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. त्याबाबत सुनेत्रा पवार यांना प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांना रडू कोसळले होते. त्यावरील प्रश्‍नाला उत्तर देताना पवार म्हणाल्या, ""शरद पवार यांच्यावर टीका केली की, हेडलाईन होते हे सर्वांना माहीत आहे. दररोज शरद पवार यांच्या विरोधात कटकारस्थान सुरू आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT