Supriya Sule sakal
पुणे

Supriya Sule :सुप्रिया सुळेंनी घेतले भीमाशंकराचे दर्शन ; केली खास पार्थना

Supriya Sule : कित्येक वर्ष चालत आलेल्या परंपरेला खंड

सकाळ डिजिटल टीम

Supriya Sule : या वर्षी अर्ध्या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे तर आर्ध्या महाराष्ट्रामध्ये कोरडा दुष्काळ आहे. शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी दूर होऊ दे व सुख शांती समृद्धी यावी बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र व्हावा अशी प्रार्थना खासदार सुप्रिया सुळे यांनी भीमाशंकर चरणी केली.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी प्रतिभाताई शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे लिलाताई मणियार यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येऊन शिवलिंगावरती जल अभिषेक केला.दरवर्षाप्रमाणे याही वर्षी संजय गवांदे यांनी पौराहित्य केले.गेले ४१ वर्ष प्रतिभाताई पवार ह्या आपल्या मैञिणींसह बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी येत असतात परंतु गेले काही वर्ष गर्दीचा ओघ पाहता येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून इतर दिवशी येऊन ते आपले व्रत पूर्ण करत असल्याचे पहावयास मिळत आहे.

श्री क्षेञ भीमाशंकर व आमचे अतुट नाते असुन भीमाशंकरचा आर्शिवाद सदैव आमच्या पाठीशी राहीला आहे.विशेष म्हटले तर येथील आदिवासी लोकांचे प्रेम आमच्यावर आहे.ह्याची आम्हाला जाणीव असुन श्रावण महिन्यामध्ये भीमाशंकरला येण्याची परंपरा आम्ही पुढेही चालु ठेवणार आहे असे सुळे यांनी सांगितले.

या वेळी श्री शेत्र भीमाशंकर देवस्थान च्या वतीने प्रतिभाताई पवार व सुप्रियाताई सुळे यांचा सत्कार करण्यात आला.त्याच प्रमाणे तळेघर डिंभे शिनोली येथील ग्रामस्थांनी सत्कार केला.

दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये प्रतिभा शरद पवार, लिलाता मणियार आदिक त्याच प्रमाणे सहकार मंञी दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील ह्या दर्शनासाठी येत असत. परंतु ह्या वर्षी वळसे पाटील ह्यांच्या कुटुंबातील कुणीही नसल्यामुळे गेले कित्येक वर्ष चालत आलेल्या परंपरेला खंड पडल्याचे दिसुन आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT