supriya sule propaganda rohit pawar and bjp ed action against arvind kejriwal Sakal
पुणे

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त काटेवाडी येथे कोपरा सभा

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी : मी जर त्यांच्याकडे गेलो असतो तर एवढ्या कमी वयात मलाही मंत्रीपद मिळाली असते. तसेच त्यांच्याकडे मी गेलो असतो तर माझ्यावर ईडीची कारवाई झाली नसती. मात्र मी पवार साहेबांच्या सोबत राहिलो. विचाराच्या सोबत राहिलो.

मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला.काटेवाडी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारा निमित्त आमदार रोहित पवार यांनी सोमवारी ( ता. २९) कोपरा सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, विरोधकांच्या मलिदा गॅंग मधील कार्यकर्ते असे म्हणतात की या गावातील बूथ चे मतदान सुप्रिया ताईंना प्लस मध्ये झाले तर आम्ही तुमच्याकडे बघतोच. परंतु मी तुम्हाला सांगतो हे काहीही करू शकणार नाहीत.

लोकसभेचे मतदान झाल्यानंतर पुढील सहा महिन्यातच यांना विधानसभेसाठी पुन्हा तुमच्याकडे यायचे आहे. त्यामुळे वीज बंद करीन पाणी बंद करील अशा ज्या धमक्या देत आहेत यापैकी ते काहीही करणार नाहीत.

मागील साठ वर्ष ज्या विचाराच्या पाठीमागे आपण आहोत त्याच विचाराच्या मागे उभे राहायचे आहे. आपलं कुटुंब कुणी फोडत असेल तर त्याचा बदला घ्यायचा. तुम्हाला पदे साहेबांमुळे मिळाली. व त्या पदांच्या जोरावरच तुम्ही विकास निधी मतदार संघामध्ये आणला.

आणि आता तेच नेते सांगतात विकास निधी मी आणला म्हणून मात्र साहेबांमुळे पदे मिळाली म्हणून तुम्हाला विकास निधी आणतात हे मात्र विसरता. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

चोर तो चोर वर शिरजोर....

कन्हेरीच्या प्रचार सभेमध्ये मंगलदास बादल नावाचा माणूस आला होता. त्याच्या भाषणाची कॉलिटी बघा. मी जर तिथे असतो तर त्याच्या कानाखाली लावली असती. यावर उपस्थितानी देखील त्याला खरेच मारायला हवे होते.

आपल्या गावातील देखील बरीच माणसे तिथे होती. वरच्या राजकारणाबद्दल काही बोल पण साहेबांच्या बद्दल बोलायचं नाही असे त्याला सांगायला हवे होते, चोर तो चोर वर शिरजोर, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या.

यावर रोहित पवार म्हणाले, मी ज्या अजितदादांचा फॅन होतो ते पूर्वीचे ओरिजनल अजितदादा असते तर दादांनी त्याला तिथेच ठोकला असता. मात्र दादांनी काय केले तर डोके खाली घातले. हे योग्य आहे का? ज्या गोष्टी तुम्हाला बोलता येत नाहीत त्या अशा भाडेकरूंच्या माध्यमातून तुम्ही बोलता आणि ते आम्हाला कळणार नाही का? असाही सवाल यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

भाजपला येथून हद्दपार करणार म्हणजे करणार...

भाजप नेते चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन म्हणतात आमचं टार्गेट शरद पवार आहेत. आपल्याच माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर पवार साहेबांना लक्ष केलं जात असेल. तर आपण हे होऊन देणार आहोत का? आम्ही आजपर्यंत भाजपच्या विरोधात लढलो आहोत. आताही भाजपच्याच विरोधात आम्ही लढत आहोत. कोणी त्यांच्यासोबत गेले तरी आम्हाला त्याच्याशी घेणे देणे नाही. भाजपला आम्ही येथून हद्दपार करणार म्हणजे करणार, असा निर्धार आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT