Supriya Sule statement Financial assistance should be given to affected farmer lumpy skin disease pune sakal
पुणे

Supriya Sule : लम्पीपीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी - सुप्रिया सुळे

सुमारे ३० लाख जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली असून, दीड लाखांहून अधिक जनावरे दगावली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लम्पी आजारामुळे देशातील पशुधन आणि दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. सुमारे ३० लाख जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली असून, दीड लाखांहून अधिक जनावरे दगावली आहेत. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचारही करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत केली. खासदार सुळे यांनी महाराष्ट्रासह देशभरात लम्पी आजारामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. या आजारामुळे हजारो शेतकऱ्यांनी पशुधन गमावले आहे. शिवाय, त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.

परिणामी दुग्धव्यवसाय अडचणीत आला असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान लक्षात घेता सरकारने मदत करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच मोफत उपचारही देण्याची गरज आहे. लम्पीचा प्रत्येक वेळी नवा विषाणू येत असल्याचे पशुतज्ज्ञांचे म्हणणे याचा अर्थ हा किती घातक आजार आहे, ते लक्षात घ्यायला हवे. या रोगावर एकच लस प्रभावी ठरत नाही. त्यामुळे या रोगाचे आणखी संशोधन होऊन प्रभावी लस तयार केल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

देशातील स्थिती

लम्पीग्रस्त जनावरे : २९ लाख ५२ हजार २२३

दगावलेली जनावरे : १ लाख ५५ हजार ७२४

महाराष्ट्रातील स्थिती

लम्पीग्रस्त जनावरे : ३ लाख ९५ हजार ४२६

दगावलेली जनावरे : २८ हजार ३७

लम्पी रोगाबाबत उपचार

पशुसंवर्धन विभाग टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८

राज्यस्तरीय कॉल सेंटर टोल फ्री क्रमांक १९६२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Red object in galaxy : अवकाशात दिसले रहस्यमयी लाल ठिपके, पृथ्वीवर होणार गंभीर परिणाम? नेमका विषय काय, जाणून घ्या..

Anurag Thakur : सशक्त भारतासाठी मोदींची पंचसूत्री आवश्‍यक; माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Latest Marathi News Updates : प्राण गमावलेल्यांच्या कृत्यांबद्दल ऐक्य व्यक्त करण्यासाठी बौद्धनाथ स्तूपाबाहेर मेणबत्ती मार्च

SCROLL FOR NEXT