Pune Porsche Accident  sakal
पुणे

Pune Porsche Accident : सुरेंद्रकुमार अग्रवाल व विशाल अग्रवाल यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

दोघांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे तपास अधिकारी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयात सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात चालकाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवल्याप्रकरणी मुलाचे वडील व आजोबा या दोघांनाही न्यायालयाने शुक्रवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए.पांडे यांनी याबाबतचा आदेश दिला.

मुलाचे वडील विशाल अग्रवाल (वय ५०, आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ७७, दोघेही रा.बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने कैदेत ठेवणे (भारतीय दंड संहीता कलम ३४२), अपहरणाचा प्रयत्न (कलम ३६५), बेकायदा लपवून ठेवणे किंवा डांबून ठेवणे (कलम ३६८), धमकावणे (५०६) यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. विशाल अग्रवाल याने चालकाचे अपहरण केल्यानंतर चालकाकडून हिसकावून घेतलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला. चालकाचे अपहरण करण्यासाठी त्यांनी आणखी कोणाची मदत घेतली ?बंगल्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणात छेडछाड करण्यासाठी कोणी मदत केली, याबाबत तपास सुरू आहे.

दोघांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे तपास अधिकारी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयात सांगितले. या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग निष्पन्न करण्यासाठी अगरवाल बापलेकाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील नितीन लडकत व योगेश कदम यांनी केली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता दोघांचाही मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT