पुणे

पत्नीच्या मृत्यूने पतीचा तहसीलसमोर एल्गार

CD

शिरूर, ता. १ : पूजा राहुल गई (वय २८, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांचा हाताच्या कोपरावर शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी त्यांचे पती राहुल देवीदास गई यांनी आजपासून येथील तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
कोळपे हॉस्पिटलमध्ये ६ ऑगस्टला पूजा गई यांचा हातावरील शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. याबाबत राहुल गई यांनी खबर दिली असून शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळचे दादुलगाव (ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) येथील राहुल सध्या रांजणगाव येथील शेळकेवस्ती येथे वास्तव्यास असून, रांजणगाव एमआयडीसीतील खासगी कंपनीत सिक्युरिटी सुपरवायझर आहेत.
राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ऑगस्टला मुलगा प्रणव (वय ६) याच्या उपचारासाठी ते पत्नी पूजासह शिरूरला आले होते. परतताना दुचाकीवरून पडल्याने पूजा यांच्या उजव्या हाताच्या कोपराला इजा झाली. कोळपे हॉस्पिटलमध्ये तपासणीअंती फ्रॅक्चर असल्याचे सांगून शस्त्रक्रियेसाठी पाच ऑगस्टला त्यांना दाखल केले. सहा ऑगस्टला सकाळी ११ वाजता शस्त्रक्रियेसाठी नेल्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रक्रियेदरम्यान हॉस्पिटल आणि डॉक्टरांची भूमिका संशयास्पद होती, असा आरोप राहुल गई यांनी केला आहे. पत्नीला कोणताही आजार नसताना रक्तदाब कमी झाल्याचे कारण सांगण्यात आले, तसेच प्रकृती गंभीर असताना माहिती दिली नाही, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. ससून रुग्णालयातील शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी राहुल गई यांची भेट घेऊन अहवालानंतर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मुलाला किडनी देणार होती आई
राहुल गई यांचा सहा वर्षांचा मुलगा प्रणव याला ''नेफ्रॉटीक सिन्ड्रोम'' हा किडनीचा विकार असून, पूजा त्याला किडनी देणार होत्या. राहुल यांच्या तुटपुंज्या पगाराला हातभार लावण्यासाठी पूजा शिवणकामही करत होत्या. "आता माझा संसार उद्ध्वस्त झाला, मी नोकरी करू की मुलाला सांभाळू?" अशी हताश प्रतिक्रिया राहुल गई यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

Pune News : चारच्या पुढे बेस-टॉप असल्यास गुन्हा दाखल होणार; साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा

SCROLL FOR NEXT