पुणे

‘त्या’ डॉक्टरची तडकाफडकी बदली

CD

लोगो : सकाळ इम्पॅक्ट


सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १९ : सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एका नवविवाहितेला गर्भाशय गमवावे लागल्याचे सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने ठळक प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी लातूरच्या उच्चस्तरीय समितीकडून दिवसभर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील १३ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. महिलेच्या पोटात कापसाचा बोळा व सर्जिकल वस्तू आढळल्या होत्या.
मुलीच्या सिझेरीयननंतर हा प्रकार घडल्याचा आरोप नवविवाहितेच्या आईने केला होता. त्याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी प्रसूती विभागातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम लोध यांची अंबाजोगाई येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रात तडकाफडकी बदली केली. दरम्यान, याच प्रकरणात आठही स्त्रीरोगतज्ज्ञांना कडक शब्दांत योग्य आणि तत्पर सेवा देण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.
​बीड जिल्हा रुग्णालयातील घटनेनंतर आणि पीडित संध्या गायकवाड यांच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर लातूरचे आरोग्य उपसंचालक यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती बीडमध्ये दाखल झाली. सिझर शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर कर्तव्यावर असलेले सर्व डॉक्टर, नर्स अशा एकूण १३ जणांचे जबाब नोंदविण्यात आले.
डॉक्टरांच्या दाव्यानुसार जर बीडमध्ये महिलेच्या पोटात कापसाचा बोळा राहिलाच नव्हता, तर पुण्यातील ससून रूग्णालयातील शस्त्रक्रियेत तो कसा बाहेर काढण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ससून रुग्णालयात पीडित महिलेवर दुसरी तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती स्थिर आहे.


वैद्यकीय शिस्त पाळली का?
प्रसूतीदरम्यान आणि नंतर वैद्यकीय शिस्त पाळली का? सिझर करताना निर्जंतुक केलेला कापसाचा बोळा वापरण्यात आला होता का? शस्त्रक्रिया पूर्ण होताच तो मोजून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला होता का? असे प्रश्न चौकशी समितीने डॉक्टरांना विचारले. त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

IND vs SL 2nd Test: मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून तीन प्रमुख खेळाडूंची माघार; आता WTC Final मध्ये पोहोचणार कसे?

Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा भाजपला डिवचले

Kupwad MIDC Two dead Shock : सांगलीत क्रेनचा विद्युतवाहिनीला धक्का; दोघांचा जागीच मृत्यू, कुपवाड एमआयडीसीतील घटना

SCROLL FOR NEXT