Corona-Test 
पुणे

Coronavirus : पावणेसहा लाख नागरिकांचे पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वेक्षण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांत पिंपरी-चिंचवडमधील पाच लाख 76 हजार 918 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यासाठी 244 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. 

कोरोना संसर्ग झाल्याने वायसीएम व भोसरी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या दहा जणांचा चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह असलेल्या बारापैकी केवळ दोन व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांचा चौदा दिवसांना आयसोलेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही लॅबमध्ये तपासण्यात येतील. त्यांच्या 24 तासांत सलग दोन तपासण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांनाही घरी सोडण्यात येणार आहे. 

दरम्यान, वायसीएम व भोसरीसह आठ खासगी रुग्णालयातही कोरोना संशयितांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या घशातील नमुने एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठविले जात आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आल्यास चौदा दिवस आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत. तसेच, सर्वेलियन पथकाद्वारे परदेशातून आलेले व होम क्वॉरनटाइन व्यक्तींची तपासणी सुरू आहे. 

दृष्टिक्षेप 
एकूण नमुने : 307 
अहवाल प्राप्त : 253 
प्रतीक्षेत अहवाल : 20 
निगेटिव्ह : 253 
पॉझिटिव्ह : 12 
बरे झालेले : 10 
उपचार सुरू : 2 
होम क्वॉरनटाइन : 1533 
होम क्वॉरनटाइन पूर्ण : 436 
सर्वेक्षण : 5,76,918

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT